घरमहाराष्ट्रमाझ्या काकाला जाणता राजा म्हणा, असं मी कधी म्हणालो का? अजित पवारांचा उपरोधिक टोला

माझ्या काकाला जाणता राजा म्हणा, असं मी कधी म्हणालो का? अजित पवारांचा उपरोधिक टोला

Subscribe

Ajit Pawar | शरद पवारांना लोक जाणता राजा म्हणतात, यावर भाजपाकडून आक्षेप घेतला जातो, असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर अजित पवारांनी अत्यंत मिश्किल शब्दांत टिप्पणी केली.

मुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार चर्चेत आहेत. आज त्यांनी माध्यमांसमोर येत त्यांची भूमिका स्पष्ट केली. मी कधीच महापुरुष आणि स्त्रियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं नाही. तसंच, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत मी काहीही चुकीचं बोललेलो नाही, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, शरद पवारांना लोक जाणता राजा म्हणतात, यावर भाजपाकडून आक्षेप घेतला जातो, असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर अजित पवारांनी अत्यंत मिश्किल शब्दांत टिप्पणी केली.

आता मी म्हटलं की माझ्या काकाला जाणता राजा म्हणा? काय बोलतो राव. मी म्हणालो का की माझ्या काकाला तुम्ही जाणता राजा म्हणा. ज्यांनी तो शब्दप्रयोग केला त्याला जाऊन विचारा. आम्हाला कशाला विचारता? असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेले आरोप खोडून काढले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावंर भाष्यही केलं.

- Advertisement -

हेही वाचा – मी कुठल्याही महापुरुषांबद्दल चुकीचं बोललो नाही, अजित पवार त्या वक्तव्यावर ठाम

म्हणून स्वराज्यरक्षक म्हणावे – अजित पवार

सुरुवातीला माझी भूमिका हीच होती की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापन केली, स्वराज्य निर्माण केलं, शिवाजी महाराजांनंतर तिथे छत्रपती संभाजी महाराजांनी त्या सर्व स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम केलं, ज्यावेळी स्वराज्याचं रक्षण करतो असं म्हणतो त्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. स्वराज्यात सगळ्या जाती धर्माची लोकं राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं, आणि त्या स्वराज्याचं रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केलं, त्यामुळे त्यांना स्वराज्यरक्षक म्हणणे हेच व्यापक आणि अर्थपूर्ण आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

असा मी कोणता गुन्हा केला

असा मी कोणता गुन्हा केला किंवा कुठलं चुकीचं बोललोय की ज्यातून महाराजांचा अपमान झाला. यासंदर्भात माझ्याकडे राजीनामा मागण्याऐवजी ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे, त्यांच्याबद्दल आंदोलकांच काय मत आहे, स्पष्टपणे राज्याला सांगितलं पाहिजे. नेहमीप्रमाणे मीडियानेही अजित पवार दिसेना, कुठे गेलेत, एवढी का तुम्हा सगळ्यांना माझी आठवण येते मला काही समजलं नाही. प्रेम आहे मान्य आहे पण मला वैयक्तिक आयुष्य आहे की नाही, असंही अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -