घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'इलेक्शन मशीन' भाजपाला नाशिक पदवीधरच्या उमेदवाराची घोषणा करायला का लागतोय वेळ?

‘इलेक्शन मशीन’ भाजपाला नाशिक पदवीधरच्या उमेदवाराची घोषणा करायला का लागतोय वेळ?

Subscribe

नाशिक : भारतीय जनता पार्टी ही पूर्णवेळ प्रचार या भूमिकेत असलेल आपण बघितलं आहे. अगदी छोटी ग्रामपंचायत पासून ते थेट राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत मायक्रो प्लॅनिंग करून त्याची काटेकोर अंबलबाजवणी करण्यात भाजपाचा हातखंडा आहे. त्यामुळेच तर राजकीय विश्लेषक भाजपाला इलेक्शन मशीन असेही संबोधतात. नुकतीच राज्यभरातील पदवीधर निवडणूक जाहीर झाली. येत्या ३० जानेवारीला त्यासाठी मतदान पार पडणार आहे. कॉंग्रेस पक्षाचे डॉ. सुधीर तांबेनी मागील ३  निवडणुकीत हॅट्रिक लगावली असून यंदा त्यांचा विजयाचा चौकार रोखण्यासाठी भाजपानेही चांगलीच कंबर कसली आहे. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जवळ आली असूनही प्रत्येक निवडणुकीत अग्रस्थानी असलेल्या भाजपला आपला उमेदवार निश्चित करता आलेला नाहीये.

कॉंग्रेस पक्षाकडून याआधीच हॅट्रिक लगावलेले डॉ. सुधीर तांबे यांची अपेक्षितरित्या निश्चित झाली आहे परंतु, भाजपाकडून प्रवारा शिक्षण संस्थेचे सभापती तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांचे पारड जड असलं तरी नाशिकच्या के.व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, धनराज विसपुते यांचेही नाव शर्यतीत आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे तरी भाजपाकडून उमेदवाराची घोषणा होत नसल्याने मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

- Advertisement -

नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार अश्या पाच जिल्ह्यांचा मिळून नाशिक पदवीधर मतदारसंघ तयार होतो. यात अहमदनगर जिल्ह्यातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यातील मतदारही निर्णायक ठरतो. त्यामुळे उमेदवारी देत असताना प्रादेशिक समतोल अत्यंत महत्वपूर्ण ठरतो. एका जिल्ह्यातील उमेदवार दिला तर त्याचा परिणाम दुसर्‍या जिल्ह्यातील मते आपल्या झोळीत टाकून घेण्यावर होऊ शकतो. हॅट्रिक साधलेले डॉ. सुधीर तांबे यांनी मागील काळात आपली ताकद अधिक वाढवली आहे. त्याचाच परिणाम म्हणून २०१७ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना अत्यंत सहजरीत्या विजय संपादन करता आला होता. त्यांना जर शह द्यायचा असेल तर भाजपाला तोडीसतोड उमेदवार तर द्यावाच लागेल त्याचसोबत आपल्या पक्षातील इतर इछुकांना थोपवून त्यांना निवडणूक प्रक्रियेत सक्रियही ठेवावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -