घरताज्या घडामोडी'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत ६ लाख झेंड्यांचे वाटप

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ६ लाख झेंड्यांचे वाटप

Subscribe

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार,मुंबई महापालिका 'घरोघरी तिरंगा' अर्थात 'हर घर तिरंगा' अभियान राबविणार आहे. त्यासाठी पालिका ७ कोटी रुपये खर्चून ५० लाख झेंड्यांचे मोफत वाटप करणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत पालिका कार्यालयासह विविध सोसायटी, इमारती, झोपडपट्टी परिसरात ६ लाख झेंड्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Distribution of 6 lakh flags under Har Ghar Tiranga campaign)

५० लाख झेंड्यांचे मोफत वाटप

- Advertisement -

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार,मुंबई महापालिका ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविणार आहे. त्यासाठी पालिका ७ कोटी रुपये खर्चून ५० लाख झेंड्यांचे मोफत वाटप करणार आहे. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी पालिका प्रशासन, विविध क्षेत्रांमधील सामाजिक संस्थां, स्वयंसहाय्यता गट, बचत गट, स्वयंसेवक आदींच्या सहकार्याने झोपडपट्टीतील चाळी, वसाहती, मध्यम वर्गीय सोसायटी, उंच इमारती, पालिका, खासगी व सरकारी कार्यालये आदी ठिकाणी भारतीय तिरंग्याचे मोफत वाटप करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेने २ ऑगस्टपासून ते आजपर्यंत विविध ठिकाणी ६ लाख झेंड्यांचे मोफत वाटप केले आहे. आणखीन ४४ लाख झेंड्यांचे वाटप पुढील १० दिवसात करण्यात येणार आहे. तसेच, काही ठिकाणी या अभियानाची माहिती देण्यासाठी फ्लॅक्स, होर्डिंग यांचे वाटप करण्यात येत आहे.

- Advertisement -

मरीन ड्राईव्ह येथे ‘लेझर शो’

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान मरीन ड्राईव्ह येथे ‘लेझर शो’ देखील होणार आहे. या कालावधीत प्रत्येकाने आपल्या निवासस्थानाच्या गॅलरीत, खिडकीत, दरवाजावर हा झेंडा लावायचा आहे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी पालिकेकडून मोफत झेंड्यांचे वाटप युद्धपातळीवर करण्यात येणार आहे.


हेही वाचा – रस्त्यांवरील खड्डे भरण्याची अनोखी पद्धत, आनंद महिंद्रांनी व्हिडीओ केला शेअर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -