घरताज्या घडामोडीठाण्यात प्रतीकात्मक हनुमंताच्या हस्ते हनुमान चालिसा पुस्तिकेचे वाटप

ठाण्यात प्रतीकात्मक हनुमंताच्या हस्ते हनुमान चालिसा पुस्तिकेचे वाटप

Subscribe

मनसेचा दहा हजार पुस्तिके वाटपाचा अभिनव उपक्रम

एकीकडे भोंगा व हनुमान चालीसा यांच्या वरून संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभुमीवर ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दहा हजार हनुमान चालीसा पुस्तिका वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सोमवारी ठाण्यातील वसंत विहार येथील हनुमान मंदिरातील हनुमानाचे दर्शन घेऊन प्रतिकात्मक हनुमानाच्या रूपातील व्यक्तीच्या हस्ते हनुमान चालीसा पुस्तकांच्या वाटपाला सुरू झाली.

या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हनुमान चालीसा पोहोचवण्यात येईल असा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी व्यक्त केला आहे. तर ठाणेकर नागरिकांना हनुमान चालीसा उपलब्ध होण्यात कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी ठाण्यात मनसेच्या वतीने ठाण्यातील सर्व मंदिरात तसेच घरोघरी जाऊन हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तर भविष्यात नागरिकांच्या मागणीप्रमाणे हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप केले जाणार असल्याचेही शेवटी महिंद्रकर यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : बाबरी मशिद पाडली तेव्हा राऊत सामनाचा पगार तरी घेत होते का?, नितेश राणेंची टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -