बाबरी मशिद पाडली तेव्हा राऊत सामनाचा पगार तरी घेत होते का?, नितेश राणेंची टीका

भाजप आणि शिवसेना यांच्यात बाबरी मशीद कोणी पाडली?, या नव्या मुद्द्यावरून संघर्ष पेटला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईतील सभेत दावा केला की, बाबरी पाडली तेव्हा आपण तिथे उपस्थित होतो. बाबरी पाडल्याचा शिवसैनिकांचा दावा खोटा आहे. अशातच बाबरी मशिद पाडली तेव्हा राऊत सामनाचा पगार तरी घेत होते का?, असा सवाल उपस्थित करत भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

नितेश राणे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात ट्विट देखील केलं आहे. खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबरी मस्जिद पाडण्याच्या मुद्दयावर टीका केली होती. संजय राऊतांनी बाबरी मस्जिदच्या तोडण्यावर बोलणं म्हणजे हलकटपणाचं कळस आहे. मला संजय राऊतांनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. जेव्हा बाबरी मस्जिद तोडली तेव्हा तुम्ही सामनाचा पगार तरी घेत होतात का, सामनामध्ये तरी आला होतात का?, असा सवाल राणेंनी उपस्थित करत राऊतांवर टीका केली आहे.

आमच्या माहितीनुसार तेव्हा तुम्ही लोकप्रभामध्ये लिहायचे. माझ्या हातामध्ये संजय राऊत यांनी लिहिलेली २६ एप्रिल १९९२चा एक लेख आहे. ज्यामध्ये त्यांनी रामाची राजकीय फरफट नावाचा लेख लिहिला आहे. तसेच त्यांनी राम मंदिराच्या विरोधात हा लेख लिहिला आहे. आता तेच संजय राऊत तोंड उघडून जर बोलणार असतील तर, खरंच हे हलकटपणाचं कळस आहे, असं नितेश राणे म्हणाले.

लालकृष्ण अडवाणी यांचा २९ डिसेंबर २००० सालचा हा व्हिडिओ आहे. याशिवाय संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्या पानावर बाबरी पाडल्याच्या बातम्याही ट्विट केल्या आहेत. यामध्ये आक्रमक शिवसैनिकांनी बाबरीचे घुमट उद्धवस्त केले, असे मथळ्यात लिहिले आहे.


हेही वाचा : Mehul Choksi : मेहुल चोक्सीच्या अडचणीत भर; सीबीआयकडून नवीन गुन्हा दाखल