घरमुंबईबाबरी कुणी पाडली?, हा घ्या पुरावा, संजय राऊतांनी दाखवला अडवाणींचा व्हिडिओ

बाबरी कुणी पाडली?, हा घ्या पुरावा, संजय राऊतांनी दाखवला अडवाणींचा व्हिडिओ

Subscribe

मुंबईत झालेल्या भाजपाच्या बुस्टर सभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता तिथे उपस्थित नव्हता, असा गंभीर आरोप केला. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाबरी पाडताना शिवसैनिक असल्याचा पुरावाच सादर केला आहे.

बाबरी मशीद कोणी पाडली यावरून शिवसेना आणि भाजपातील वाद चांगलाच पेटला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार प्रतित्युत्तर सुरू आहे. मुंबईत झालेल्या भाजपाच्या बुस्टर सभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता तिथे उपस्थित नव्हता, असा गंभीर आरोप केला. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाबरी पाडताना शिवसैनिक असल्याचा पुरावाच सादर केला आहे. राऊत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा व्हिडिओ ट्विट करत फडणवीसांच्या आरोपातील हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

तर राऊत यांनी आणखी एक ट्टिवट करत त्यामध्ये काही वृत्तपत्राचे कटआऊट्सचे फोटो टाकले आहे. या ट्विटला संजय राऊतांनी ‘आता बोला..’ असे कॅप्शन दिले आहे. लालकृष्ण अडवाणी यांचा २९ डिसेंबर २००० रोजीचा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्टिट केला आहे. एका चॅनेलच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ असून यामध्ये बाबरी मशीद पाडण्याच्या विषयावर अडवाणी यांनी वक्तव्य केले आहे. अडवाणी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, बाबरी मशीद पाडणे ही खूप मोठी चूक होती. त्यात काहीही शंका नाही. मी पहिल्यांदा उमा भारती यांना तिथे पाठवले आणि सांगितले की त्यांना खाली उतरवाआणि सांगा की असे काही करु नका.मात्र, त्या परत आल्या आणि त्यांनी मला सांगितले की, मशिदीवर असलेले लोक मराठीमध्ये बोलत आहेत. ते माझे ऐकत नाहीत. त्यानंतर मी प्रमोद महाजनांना पाठवलं. ते पण तिथे गेले. पण, तेही हताश होऊन परत आले.

- Advertisement -

संजय राऊत यांनी या ट्विवटला कॅप्शन देत म्हटले की, ‘बाबरी कोणी पाडली? ऐका….’

‘आता बोला..’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -