घरमहाराष्ट्रमनोज जरांगेंना डॉक्टरांनी लावली सलाइन, प्रकृती खालावली

मनोज जरांगेंना डॉक्टरांनी लावली सलाइन, प्रकृती खालावली

Subscribe

जालना : मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. आज सकाळपासून मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून डॉक्टरांनी त्यांच्या चेकअप करून त्यांना सलाईन लावली आहे.

“सरकार जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगेंच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी जावून त्यांची तपासणी केली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगेंच्या घशाला इन्फेक्शन आणि शरीरात ताकद नसल्याने त्यांना बोलता येत नाही, अशी माहिती दिली आहे.

- Advertisement -

मनोज जरांगे म्हणाले…

यावेळी मनोज जरांगे म्हणाले, “राज्य सरकारने जर माझा जीव घ्याचे ठरवले असेल. तर मी दोन वर्ष सरकारसोबत तहच करतोय, त्या सरकारने आमच्या पदरात काही टाकले नाही. सरकारच्या मनात काय चालले, हे मला माहिती नाही. मनोज मराठा समाजाला कुणबीमध्ये समावेश करण्यासंदर्भातील जीआर काढण्यासाठी 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर मी पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा देखील मनोज जरांगेंनी दिला आहे.

हेही वाचा – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा अध्यादेश काढावा; मनोज जरांगे पाटील आग्रही

- Advertisement -

सरकारला एक महिन्याची मुदत द्यावी – राज्य सरकारचे शिष्टमंडळ

तसेच मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे, म्हणून राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मंगळवारी भेटीसाठी गेले होते. यावेळी शिष्टमंडळाने एक महिन्याची मुदत मागितली होती आणि राज्य सरकार लवकरच जीआर काढण्याचे आश्वास राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाज यांनी मनोज जरांगेंना दिले आहे. तरी सुद्धा मनोज जरांगे हे त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -