घरमहाराष्ट्ररामदेवबाबा तुमची डिग्री काय, तुम्ही बोलताय काय?

रामदेवबाबा तुमची डिग्री काय, तुम्ही बोलताय काय?

Subscribe

अस्तीत्व राज्य संघटनेचे अध्यक्ष डॅा. संदीप कोतवाल यांचा सवाल

रामदेव बाबांच्या निमित्ताने इंडियन मेडीकल असोसिएशनने (आयएमए) पुन्हा आयुर्वेदाच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. वेगवेगळे मीन्स बनवून ग्रुपमध्ये आयुर्वेदाची थट्टा सुरू असल्याचे मत डॉ. संदीप कोतवाल यांनी व्यक्त केले आहे.

खरं तर कुठल्याही प्रकारचं आयुर्वेदाचे शिक्षण नसणारा एक बाबा मनाला येईल तसा आयुर्वेदाच्या नावाखाली रुग्ण बरे केल्याचे दावे करीत असतो. या बाबाकडे कुठलीही आयुर्वेदाची डिग्री नाही. कुठलाही पेशंट म्हणजे रुग्ण तपासणीचा अनुभव नाही. कुठल्याही रुग्णसमूह तपासणीचा स्टॅटिस्टिक नाही. जे काही हा बाबा सांगतो ते त्याच्या हाताखाली उपचार करीत असलेल्या काही डॉक्टरांनी तपासलेल्या रुग्णांच्या उपचार पद्धतीमधील ऐकीव दावे आहेत. त्यात स्वतः रामदेव बाबा यांचा एक वैद्यकीय आयुर्वेद तज्ञ म्हणून कुठलाही प्रकारचा सहभाग नाही. असा प्रकारचा हा बाबा मनाला येईल तसा आयुर्वेदाच्या नावाखाली काही तरी दावे करीत असतो. आणि या इतर संघटनांना मग आयुर्वेदावर पुन्हा एकदा विनोद करण्याची संधी मिळते.

- Advertisement -

मागणी अशी असावी की, रामदेव बाबाने यापुढे आयुर्वेदिक उपचार पद्धतीबाबत काही शास्त्रीय बोलू नये. आणि बोलल्यास तो गुन्हा म्हणून ग्राह्य धरावा. कारण आयुर्वेद उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक रुग्णाची प्रकृती तपासून त्याच्या निदानापर्यंत पोहोचून त्यानुसार उपचार पद्धती ठरवली जाते. हे काम एका आयुर्वेद शास्त्राच्या तज्ञाचे आहे. उदा. जगभरातल्या पतंजलीच्या स्टोरमधून बद्धकोष्टतासाठी एकाच प्रकारचे औषध देणारे अशा प्रकारच्या बाबा लोकांपासून लोकांनी वेळेच सावध व्हायला पाहिजे.खरं तर अशा न शिकलेल्या आणि कुठल्याही प्रकारची वैध कायदेशीर डीग्री नसलेल्या लोकांच्या विरोधात आयुर्वेदाच्या संबंधित केंद्रीय आणि राज्य परिषदेने कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु, या केंद्रीय संस्था मात्र एका पक्षाच्या अखत्यारीत असल्याने अशा बाबांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. मात्र, आयुर्वेद शास्त्रावर काहीही बोलत राहण्याने त्याची बदनामी होते.

आयएमए या सारख्या संघटनांनी यापुढे आयुर्वेदाच्या डॉक्टरांच्या विरोधात बोलण्यापेक्षा रामदेवबाबा सारख्या बोगस आयुर्वेद प्रॅक्टिस करणार्‍या व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याला आमचाही पाठिंबा असेल. म्हणजे जनतेची अशा फसव्या बाबांकडून आयुर्वेद उपचार घेण्याचे टळेल.
– डॉ.संदीप कोतवाल,एमएस, आयुर्वेद स्त्रीरोग, प्रसुती,वंध्यत्व तज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -