घरताज्या घडामोडीडॉक्टरांनो, भूमिका बदला अन्यथा कारवाई : जिल्हाधिकारी

डॉक्टरांनो, भूमिका बदला अन्यथा कारवाई : जिल्हाधिकारी

Subscribe

रुग्णालयांनी अडचणी मांडाव्यात, परस्पर निर्णय घेणे अयोग्य

खासगी रूग्णालयांनी कोरोना रूग्णांवर उपचार बंद करण्याचा निर्णय घेत रूग्णालयातील कोविड कक्ष बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावर प्रशासनाने कठोर भुमिका घेतली असून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी डॉक्टर्स असोसिएशनशी संपर्क साधत अशी भूमिका घेणे योग्य नाही असे स्पष्टपणे सांगितले. रूग्णालयांनी त्यांना येणार्‍या अडचणी मांडाव्यात पण असंविधानिक भूमिका घेउ नये असे जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे. रूग्णालयांनी आपली भूमिका बदलली नाही तर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

नाशिकमधील 172 खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आम्हाला कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली आहे. तसेच आम्ही मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या थकलो आहोत, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा आलेख उतरणीला लागला असून रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात यावे, अशी मागणीही या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. हॉस्टिपटल असोसिएशनच्या या भूमिकेबाबत बोलतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, खासगी रूग्णालयांना काही अडचणी येत असतील तर त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी आयुक्त आणि जिल्हाधिकारी सक्षम आहेत. रूग्णालयांनी त्यांना येणार्‍या अडचणी मांडाव्यात, पण असंविधानिक भूमिका घेऊ नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना रूग्णांवर उपचार करताना नागरिकांकडून येणारा दबाव हे डॉक्टरांनी मुख्य कारण दिल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -