घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रडॉ. प्राची पवार हल्ला प्रकरण : दारूच्या बाटलीआधारे हल्लेखोरांचा शोध सुरु

डॉ. प्राची पवार हल्ला प्रकरण : दारूच्या बाटलीआधारे हल्लेखोरांचा शोध सुरु

Subscribe

नाशिक : डॉ. प्राची पवार यांच्यावरील हल्ल्याची पोलिसांनी गंभीर दखल घेत तपासाची सूत्र तातडीने फिरवली आहेत. घटनास्थळावरुन पोलिसांना दारूची बाटली सापडली असून, त्या बाटलीच्या आधारे या घटनेमागील सूत्रधारांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु झाल्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस लवकरच हल्लेखोरांच्या मुसक्या आवळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

डॉ. प्राची पवार यांच्या फिर्यादीनुसार व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्राची पवार मंगळवारी (दि.१३) सायंकाळी ७ वाजता पंडित कॉलनीतील सुश्रुत हॉस्पिटलमधून गोवर्धन येथील घरी जाण्यासाठी कार (एमएच १५-जीआर ४७१७)ने निघाल्या. त्या सायंकाळी ७.२० वाजता घराकडे जाणार्‍या लोखंडी गेटवर पोहचल्या. त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमधील रेखा पाटील यांचा कॉल आला. कॉलवर बोलत असताना त्यांना पवार हाऊसच्या रस्त्यालगतचा लोखंडी गेट उघडा दिसला. त्यांनी गेटमधून आत प्रवेश केला असता त्यांना एक अनोळखी व्यक्ती दुचाकी आडवी उभी करून मोबाईलवर बोलत असल्याचा दिसला. त्यांनी दुचाकी नीट कर आडवी का लावली, तू कोण आहेस, येथे कशासाठी आलास, अशी विचारणा केली. राग अनावर झाल्याने अनोळखी व्यक्तीने तू कोण आहे, अशी विचारणा केली. तितक्यात डॉ. प्राची पवार यांच्या कारच्या उजव्या बाजूने दुसरा अनोळखी व्यक्ती आला. गाडी बंद पडली असून, पेट्रोल संपल्याने या ठिकाणी थांबलो आहे, असे दुसर्‍या व्यक्तीने डॉ. पवार यांना सांगितले.

- Advertisement -

डॉ. पवार यांनी कॉलवर रेखा पाटील यांना बंगल्यावर कॉल करून माणसे पाठव, असे सांगितले. डॉ. पवार यांनी अनोळखी व्यक्तीस नाव विचारले असता त्याने विनोद साळवे असे सांगितले. त्यानंतर पहिला व्यक्ती गेटसमोर दुचाकी आडवी करुन थांबला. तितक्यात तिसरा व्यक्ती धारदार कोयता घेऊन आला. काही समजण्याच्या आत त्याने डॉ. पवार यांच्यावर वार केले. त्यात त्यांच्या उजव्या हाताला गंभीर जखमा झाल्या. त्यावेळी डॉ. पवार यांनी सुरक्षेसाठी डाव्या हाताने प्रतिकार केला असता डाव्या हाताच्या बोटांना जखमा झाल्या. त्यावेळी दुसरे व्यक्ती लवकर करा, मारून टाका, सोडू नका, असे म्हणते होते. तितक्यात डॉ. पवार यांच्या घरातून भाचा सिद्धार्थ पवार आला. त्याला पाहून हल्लेखोर दुचाकीवरुन पळून गेले. डॉ. पवार यांना उपचारार्थ शेजारील कडलग व त्यांच्या मित्रांनी रुग्णालयात दाखल केले.
डॉ. प्राची पवारांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी सुश्रृत हॉस्पिटलबाहेर गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी हॉस्पिटलबाहेर बंदोबस्त त्यतैनात केला होता.

दिवसभरातील घडामोडी

– पोलिसांना डॉ. प्राची पवार यांच्या मोबाईल रेकॉर्डिंगवरुन एकाचे नाव शोधण्यात यश आले आहे. त्याआधारे पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
– पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपींचे फोटो दाखवले डॉ. पवारांना. मात्र, ते हल्लेखोर नसल्याचे डॉ. पवारांनी सांगितले.
– घटनेनंतर नाशिक ग्रामीण पोलीस मंगळवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत व बुधवारी दिवसभर तपास करत होते.
– दारूच्या बाटलीआधारे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घेतली एक्साईजची मदत.
– पोलीस गोवर्धन परिसरातील वाईन शॉप व सीसीटीव्ही फुटेजआधारे संशयिताचा घेताहेत शोध
– सीसीटीव्ही फुटेजचा दर्जा चांगला नसल्याने पोलिसांना येतोय तपासात अडथळा.

- Advertisement -
माजी उपमुख्यमंत्री भुजबळांनी घेतली डॉ. प्राची पवार यांची भेट

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुश्रुत हॉस्पिटलमध्ये डॉ. प्राची पवार यांची भेट घेतली. डॉ. पवार यांच्यावरील हल्ल्याचा जलदगतीने तपास करुन आरोपींच्या मुसक्या आवळा, अशी सूचना त्यांनी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -