घरताज्या घडामोडीयंदा आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास बंदी!

यंदा आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास बंदी!

Subscribe

आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्यावर बंदी असण्यामागचे कारण, पंढपूरात आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक येतात, याचं दरम्यान ड्रोन कॅमेऱ्याद्वारे यात्रेचे छायाचित्रण करून त्याचा दुरूपयोग केला जाऊ शकतो

कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदा आषाढी यात्रेसाठी १२ ते १४ लाख भाविक पंढरपूरात दाखल होणार आहेत. भाविकांची मोठ्या संख्येतील उपस्थिती लक्षात घेता, याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात आहे. त्यामुळे यंदा पंढरपूरात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यास सोलापूर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी बंदी घातली आहे.

आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्यावर बंदी असण्यामागचे कारण?
आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेऱ्यावर बंदी असण्यामागचे कारण, पंढपूरात आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक येतात, याचं दरम्यान ड्रोन कॅमेऱ्याद्वारे यात्रेचे छायाचित्रण करून त्याचा दुरूपयोग केला जाऊ शकतो. तसेच अतिरेकी कारवायांमध्ये देखील त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अशा ठिकाणी कोणतीही दहशतवादी घटना घडू नये म्हणून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून योग्य निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे की, ३० जून ते १३ जून २०२२ या आषाढी वारी काळात संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज, संत श्री निवृत्तीनाथ महाराज, संत श्री सोपानदेव महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत श्री मुक्ताबाई व संत श्री गजानन महाराज या मानाच्या पालख्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत अनेक वारकरी सुद्धा येतील. ९ जुलै रोजी सर्व पालख्या एकत्र येतील. लाखो भाविक मंदीर परिसरात एकाच ठिकाणी एकत्र येतील. या काळात नदी घाटावर, मंदिर परिसर, पालखी मार्गावर टी.व्ही. चॅनल्स, खाजगी व्यक्ती, संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते. त्यामुळे दहशतवादी घटनांचा विचार करता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करून त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अशा ठिकाणी कोणतीही दहशतवादी घटना घडू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -