घरताज्या घडामोडीमाझ्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचे नीरज गुडेंशी चांगले संबंध, फडणवीसांचा मलिकांच्या आरोपावर पलटावर

माझ्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचे नीरज गुडेंशी चांगले संबंध, फडणवीसांचा मलिकांच्या आरोपावर पलटावर

Subscribe

माझ्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नीरज गुंडेशी चांगला संबंध आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री ठाकरेंनाच विचारायला हवं असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांचा सचिन वाझे हा नीरज गुंडे असल्याचा आरोप केला होता. मलिकांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नीरज गुंडें यांच्याशी माझा संबंध आहे परंतु माझ्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चांगला संबंध आहे. माझ्यापेक्षा मुख्यमंत्री जास्त वेळा नीरज गुंडे यांच्या घरी गेले आहेत असा पलटवार फडणीस यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. नवाब मलिकांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. फडणवीस यांना नीरज गुंडेशी काय संबंध आहे असा प्रश्न केला. यावर फडणवीस म्हणाले की, नीरज गुंडे या संदर्भात स्वतः उत्तर देतील परंतु नवाब मलिकांनी आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन त्यांना विचारले पाहिजे. नीरज गुंडे आमचे संबंधीत आहेतच पण जरा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारले असते तर त्यांना कळाले असते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

माझ्यापेक्षा मुख्यमंत्री अधिक वेळ गुंडेंना भेटले

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मी जेवढ्या वेळा नीरज गुंडे यांच्या घरी गेलो होतो त्यापेक्षा अनेक वेळा मुख्यमंत्री मागील काळात त्यांच्या घरी गेले आहेत. किंवा मी जेवढा वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेले आहेत. यामुळे माझ्या आधीपासून त्यांचे संबंध मुख्यमंत्र्यांशी आहेत परंतु नवाब मलिकांकडे पुरावा असेल तर त्यांनी द्यावा. सचिन वाझे पाळण्याची गरज त्यांना आहे आम्हाला नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांचा मलिकांना इशारा

नीरज गुंडेंविरोधात काही पुरावा असेल तर कारवाई करण्यात यावी. नवाब मलिकांना सांगायचे आहे. मी काचेच्या घरात नाही राहत. नीरज गुंडे यांच्याविरोधात एकही केस नाही, त्यांच्याविरोधात कोणी तक्रार केली नाही. ते रोज राष्ट्रवादी काँग्रेसचे घोटाळे काढत असतात तुमच्यात हिंमत असेल तर त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोका असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांचा फडणवीसांवर आरोप

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात छुप्या पद्धतीने ड्रग्जची तस्करी आणि वसुली करण्यात आले. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर हा सगळा प्रकार सुरु होता असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर त्यांचा सचिन वाझे म्हणजे नीरज गुंडे वसुली करत होते. नीरज गुंडे हा केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालांमधून फिरत आहे. समीर वानखेडे यांना देखील वसुली करण्यासाठी बदली करुन आणले. फडणवीस मुख्यमंत्री असताना नीरज गुंडे नावाचा व्यक्ती हा राज्यातील पोलीस बदल्यांमधील वसुली, ड्रग्जचा व्यवसाय आणि सर्व केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालयात त्याची उठ बस होती असा आरोप मलिकांनी केला आहे.


हेही वाचा :  Drug Case : दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडणार, नवाब मलिकांच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -