घरताज्या घडामोडीdrug case : नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील "सचिन वाझे",...

drug case : नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील “सचिन वाझे”, नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

Subscribe

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात छुप्या पद्धतीने ड्रग्जची तस्करी आणि वसुली करण्यात आले. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर हा सगळा प्रकार सुरु होता असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर त्यांचा सचिन वाझे म्हणजे नीरज गुंडे वसुली करत होते. नीरज गुंडे हा केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालयांमधून फिरत आहे. समीर वानखेडे यांना देखील वसुली करण्यासाठी बदली करुन आणले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये नीरज गुंडे हा सचिन वाझे होता. हे प्रकरण मोठ्या ड्रग्जच्या व्यवसायाचे असून फडणवीसांचा सचिन वाझे याच शहरात राहतो. नीरज गुंडेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालय, अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये, पोलिसांच्या बदल्या तो ठरवत होता, ब्युरोक्रसिच्या बदल्या तोच ठरवत होता. तसेच संपूर्ण वसुली करण्यात येत होती. तसेच देवेंद्र फडणवीस जेव्हा केव्हा पुणे नवी मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचे तेव्हा त्याच्या घरी हजेरी लावायचे आणि तिथूनच फडणवीसांचा कारभार सुरु होता असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

- Advertisement -

राज्यातील फडणवीस सरकार गेल्यानंतर राज्यात असलेल्या केंद्रीय यंत्रणांचे ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि एनसीबी कार्यालयांमधून फडणवीसांचा सचिन वाझे फिरत आहे. अधिकाऱ्यांकडून करोडो रुपयांची वसुली करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांना वसुली करण्यासाठीच बदली करण्यात आली होती असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

लोकांना फसवण्यासाठी आणि ड्रग्जचा खेळ सुरु राहण्यासाठी वानखेडेंना आणण्यात आले. काशिफ खानला, ऋषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला, प्रतिक गाबाला सोडण्यात आले. फडणवीस यांच्या जबाबदारीमुळे त्यांना सोडण्यात आले. प्रतीक गाबा सगळ्यात मोठा व्यक्ती आहे. ड्रग्जचा मास्टरमाईंड आहे. नीरज गुंडे केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालयात का जाऊन बसतो. भाजपचे लोकांना का सोडण्यात आले. भाजपच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरु होता असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना नीरज गुंडे नावाचा व्यक्ती हा राज्यातील पोलीस बदल्यांमधील वसुली, ड्रग्जचा व्यवसाय आणि सर्व केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालयात त्याची उठ बस होती असा आरोप मलिकांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Drug Case : फडणवीसांच्या इशाऱ्यावरच राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू, नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -