रेल्वेने ५ लाख ४ हजार नागरिकांची भागवली भूक

पश्चिम आणि मध्य रेल्वेने ५ लाख ४ हजार गोरगरिब नागरिकांची भूक भागवली आहे.

during lockdown 5 lakh food packets were provided railway
रेल्वेने ५ लाख ४ हजार नागरिकांची भागवली भूक

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका गोरगरीब आणि मजुरांना बसलेला आहे. या निराधारांची आणि गरजू नागरिकांची भूक मिटविण्याचे काम मध्य आणि पश्चिम रेल्वेने केले आहे. आतापर्यंत पश्चिम आणि मध्य रेल्वे या दोन्ही विभागाच्यावतीने ५ लाख ४ हजार अन्नाची पाकिटे वाटली आहेत. तर रेल्वेच्या ‘मिशन फूड डिस्ट्रिब्युशन’ अभियान २९ मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. २० एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वेने सुमारे २ लाख ८५ हजार अन्नाची पाकिटे वाटली तर मध्य रेल्वेने सुमारे २ लाख १९ हजार अन्नाची पाकिटे वाटण्यात आली आहेत.

मध्य, पश्चिम रेल्वे आणि आयआरसीटीसीचे योगदान

देशावर जेव्हा जेव्हा संकट आले आहे, तेव्हा भारतीय रेल्वेने मदत केली आहे. आता कोरोनाच्या या जागतिक संकटाविरोधात सुद्धा रेल्वे पूर्णपणे आपले योगदान देताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका गोरगरीब आणि मजुरांना बसला आहे. संचारबंदी दरम्यान काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ या मजुर, गरीबांवर आली आहे. तसेच शहरातील या लोकांची जेवणाची काळजी भागवण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘मिशन फूड डिस्ट्रिब्युशन’ अभियान राबविले आहे. या अभियान अंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वेने ५ लाख ४ हजार अन्नाची पाकिटे वाटली आहेत. हे पाकिट पश्चिम रेल्वेच्या मुंबई, अहमदाबाद, राजकोट, बडोदा, रतलाम, भावनगर या सहा विभागातील वेगवेगळ्या स्थानकाच्या आसपासच्या परिसरातील गरजू व्यक्तींना अन्नाची पाकिटे वाटली जात आहेत. तर मध्य रेल्वे प्रशासनाने सुमारे २ लाख १९ हजार अन्नाची पाकिटे वाटली आहेत. तर मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर, नागपूर येथील पाच विभागात गरजू आणि निराधार नागरिकांना अन्नाची पाकिटे वाटली आहेत.

रेल्वेला आयआरसीटीसी मिळाली मदत

इंडियन रेल्वे कॅटरिग अ‍ॅण्ड टुरिझम महामंडळाने (आयआरसीटीसी) पुढाकार घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला मदत केली आहे. आयआरसीटीसीच्या मुंबई सेंट्रल, पुणे आणि अहमदाबाद येथील बेस किचनची अन्न शिजवले आणि आयआरसीटीसीकडून दोन्ही विभागाला ५ लाखांपैकी २ लाख ८६ हजार अन्नाची पाकिटे पुरविण्यात आली. या अन्नाची पाकिटे वाटण्यासाठी आरपीएफ, रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचारी मदत करत आहेत. त्यामुळे ५ लाख अन्नाची पाकिटे लॉकडाऊन काळात वाटणे शक्य झाले आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.


हेही वाचा – ‘माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली कोरोना वाढत असल्याची चिंता’