नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पाण्याखाली, राधानगरी धरणातील विसर्ग वाढल्याने पाणी पातळीत वाढ

नृसिंहवाडीचे दत्त मंदिर कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याखाली गेले आहे. राधानगरी धरणातील विसर्ग वाढल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे.

kolhapur_Dutt temple

इचलकरंजी – कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीक्षेत्र नरसिंहवाडीचे दत्त मंदिरा पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर उत्सवमूर्तीवरील सभामंडप दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

धरण क्षेत्रात जोरदार पाऊस –

कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली आहे. मात्र, राधानगरी आणि कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना व राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून एनडीआरएफ टीम, जिल्हा प्रशासन टीम सज्ज करण्यात आली आहे.

मंदिर परिसरात प्रवेश बंदी –

मंदिर परिसरात ज्या ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे, त्या ठिकाणी नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. पुराच्या पाण्यात हुल्लडबाजी करणाऱ्यांनाही पोलिसांनी पूर परिस्थिती असताना पाण्यात उतरू नेय अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नरसिंहवाडी मंदिर पूर्ण पाण्याखाली –

कोल्हापूर, सातारा आणि सांगली परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली. त्यातच राधानगरी आणि कोयना धरण परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने धरणातून पाणी विसर्गही चालू आहे. त्यामुळे धरणाखाली असणाऱ्या नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळ नृसिंहवाडीचे पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.