घरठाणेडॉक्टर आजारी पडल्याने कान, नाक, घसा ओपीडी बंद

डॉक्टर आजारी पडल्याने कान, नाक, घसा ओपीडी बंद

Subscribe

रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रकार

कल्याण । कान ,नाक, घसा या रुग्णांच्या तपासणीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाई रुक्मिणी रुग्णालयात ओपीडी साठी खास पॅनलवर नियुक्त करण्यात आलेले दोन्ही डॉक्टर आजारी पडल्याने ओपीडी बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. ओपीडी साठी दिलेल्या वारामध्ये रुग्ण दुपारनंतर येत असून डॉक्टरच उपलब्ध नसल्याने तपासणीसाठी येणारा रुग्ण केस पेपर काढीत माघारी जात आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महासभेने ओपीडी साठी पॅनलवर दोन डॉक्टरांना घेण्यासाठी मंजुरी दिली होती. बाई रुक्मिणी रुग्णालयात कान, नाक, घसा याबाबत रुग्णांची तपासणी करिता सोमवार व गुरुवार या दिवशी डॉक्टर प्रीती नायर महाजन तर मंगळवार आणि शुक्रवारी डॉक्टर निखिता शिंदे या दोन डॉक्टर उपलब्ध असतात. मात्र मागील आठवड्यापासून या दोन्ही डॉक्टर रुग्णालयात येत नसल्याने तपासणी करिता येणाऱ्या रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे समोर आले आहे.

कल्याण हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने कान, नाक, घसा हे तपासणी करता शहर व शहराबाहेरील रुग्ण वार असलेल्या दिवशी येत असतात. विशेष म्हणजे केस पेपर काढण्यासाठी गर्दी तर असतेच परंतु लांबच्या पल्याहून येत असणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांसाठी प्रवासासाठी होणारा खर्च अधिक असतो. त्यातच संबंधित डॉक्टर ओपीडी असणाऱ्या दिवशी येत नसल्याने तशा स्वरूपाचे आरोग्य विभागाकडून रुग्णालयात सूचना फलकावर लावली जात नसल्याचा आरोप तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी केला आहे. ओपीडी साठी वार ठरलेल्या दिवशी किमान ५० च्या आसपास रुग्ण तपासणीसाठी येत असतात.

- Advertisement -

याबाबत रुक्मिणी बाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम टिके यांना विचारणा केली असता ओपीडी साठी येत असणाऱ्या दोन्ही डॉक्टर आजारी असून यातील एका डॉक्टरने अंगात ताप असतानाही एका रुग्णावर आज सकाळी येऊन शस्त्रक्रिया केल्याची माहिती दिली आहे. दोन्ही डॉक्टर नियमित येत असून त्या आजारी असल्याचेही डॉक्टर टिके यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -