घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रवडापाव, मिसळ खाणे महागणार; पावाचे दर वाढले

वडापाव, मिसळ खाणे महागणार; पावाचे दर वाढले

Subscribe

नाशिक : खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असेलेला आणि गरीबांचा बर्गर म्हणून ओळखला जाणारा वडापाव आता महागणार आहे. नाशिक शहर पाव बेकरी मालक संघटनेने पावाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार आता डझनमागे ३० टक्के भाववाढ करण्याचा निर्णय संघटनेने जाहीर केला आहे. त्यामुळे पावाच्या किंमतीत पावाच्या आकारानुसार ५० पैसे ते ५ रूपयांपर्यंत वाढ होणार आहे. परिणामी वडापाव, मिसळच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

पावाच्या दरवाढीमागे कच्च्या मालाच्या किमती, वाहतूक, मजुरीत झालेली वाढ कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. २०२० नंतर पुन्हा एकदा ३० टक्क्यांनी दरवाढ करण्यात आली आहे. मैद्याचे दर १२०० रूपयांवरून १७०० रूपयांपर्यंत पोहचलेत. काही दिवसांत मैद्याचे दर ५० किलो कटटयासाठी दोन हजार रूपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. तर मजुरीतही ४० टक्के वाढ झाली आहे. पाव तयार करण्यासाठी गॅसचा वापर केला जात नाही तर लाकडाचा वापर केला जातो. लाकडाच्या किंमतीही किलोमागे ५ रूपयांवरून ८ रूपये किलोपर्यंत वाढल्या आहेत. वस्तूंच्या वाहतुकीसाठी पेट्रोल, डिझेलचे दरही वाढल्याने दरवाढीचा निर्णय घ्यावा लागल्याचे संघटनेचे पदाधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले. पावाचे दर पती पावामागे ५० पैशांनी वाढले असून आकारानुसार पावाचे दर ५ रूपयांपर्यंत वाढणार आहे.म्हणजेच दोन रूपयांना मिळणारा पाव आता अडीच रूपयांना मिळणार आहे. होलसेलसाठी हे दर असतील. त्यामुळे प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र पावासाठी सुमारे ५ रूपये मोजावे लागतील.

- Advertisement -

दोन-तीन रुपये किमतीपासून सुरु झालेला वडापावचा प्रवास १५ रुपयांपर्यंत पोहचला आहे. या पत्रकार परिषदेला बेकरी मालक संघटनेचे राहुल शिंदे मोबीन खान, ललित मानकर, नीलेश सोसे, फैयाज खान, नसीम खान, जुबेर सय्यद, नफिस खान, दीपक काळे, काले खान, संकेत जाधव, माजीद पठाण आदी पदाधिकारी व बेकरी मालक उपस्थित होते.

हे पदार्थही महागणार 

बेकरी उत्पादनांमध्ये पाव मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात. वडापावपासून ते मिसळसारख्या पदार्थांपर्यंत पावाचा उपयोग होतो. दरवाढीच्या निर्णयाने इतरही दरवाढ होईल.

बेकरी उत्पादन बनविण्यासाठी मैदा, गहु, तूप, तेल कारागिरांचा पगार, इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्याने पावाच्या दरात ३० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे २५ रूपयांस विक्री होत असलेला पाव आता ३० रूपयांना तर पावाच्या आकारानुसार यात ५ रूपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. : राहुल शिंदे, बेकरी उत्पादक

अतिशय नाईलाजाने आम्हाला ही दरवाढ करावी लागत आहे कारण आत्तापर्यंत सण वार व एकूणच परिस्थितीचा विचार करता आम्ही हि दरवार केली नव्हती परंतु आता नाईलाजाने पावाच्या दरातही वाढ करावी लागत आहे. पाव वगळता इतर कोणत्याही बेकरी उत्पादक पदार्थांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही . 40 बेकरी उत्पादकांशी चर्चा केली आणि त्यानंतर एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. : ललित मानकर, बेकरी उत्पादक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -