घरताज्या घडामोडीसहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण; आणखीन दोन कारखाने EDच्या रडारवर

सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण; आणखीन दोन कारखाने EDच्या रडारवर

Subscribe

सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरणी आता आणखीन दोन कारखाने अडचणी आले आहेत. ईडीने दोन साखर कारखान्यांची कागदपत्रे ताब्यात घेतली असून व्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सुद्धा जप्त केला होता. त्यानंतर आता ईडीने या दोन साखर कारखान्याच्या व्यवहाराची चौकशी सुरू केली आहे.

नंदुरबार येथील पुष्परेंद्धेश्वर आणि अमरावती येथील अंबादेवी सहकारी साखर कारखान्याचे व्यवहार संशयास्पद आढळून आले आहेत. ज्या पद्धतीने कारखान्यांची विक्री करण्यात आली त्यावरून ईडीने दोन्ही कारखान्यांवर कारवाई केली आहे. माहितीनुसार नंदुरबारमधील पुष्परेंद्धेश्वर कारखान्याची किंमत ७५ कोटी होती. पण हा कारखाना २८ कोटी रुपयांना विकण्यात आला आहे. त्याप्रमाणे अमरावतीमधील अंबादेवी कारखाना देखील कमी किंमतीत विकण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच याप्रकरणात ज्यांनी हे कारखाने विकत घेतले आहेत, त्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी कोरेगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली होती. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाटगे यांचा आहे. दरम्यान, हा कारखाना घेत असताना चार विविध बँकांनी कर्ज पुरवठा केला होता. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे. या बँकेने संबंधितांना ९६ कोटी रुपयांचं कर्ज दिलं. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीने नोटीस बजावली होती. तसेच या कारखान्याशी संबंधित सर्व कंपन्यांची कसून चौकशी ईडी मार्फत सुरू आहे.


हेही वाचा – ED च्या जरंडेश्वर कारखान्याच्या जप्तीने अजितदादांच्या अडचणीत वाढ

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -