घरताज्या घडामोडीYES Bank घोटाळा, राणा कपुर यांना देशाबाहेर प्रवासासाठी मज्जाव, ईडीने रात्री उशिरा...

YES Bank घोटाळा, राणा कपुर यांना देशाबाहेर प्रवासासाठी मज्जाव, ईडीने रात्री उशिरा केली अटक

Subscribe

कपुर यांना देशाबाहेर प्रवास करण्यासाठीही मज्जाव करण्यात आले आहे. तशी नोटीस ईडीकडून बजावण्यात आली आहे.

येस (YES) बॅंक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने पहिली कारवाई करत येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक केली आहे. येस बॅंकेच्या घोटाळा प्रकरणात ईडीने शुक्रवारपासूनच तपासाला वेग देत राणा कपुर यांच्या घरावर छापा टाकला होता. तब्बल ३० तास चाललेल्या चौकशीनंतर रात्री उशिरा त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी राणा कपुर यांना अटक केली. आज सकाळी ११ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

राणा कपुर यांच्या मुंबईतील समुद्र महल या त्यांच्या राहत्या घरातून त्यांना रात्री १२.३० वाजता ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. संपुर्ण रात्रभर त्यांची कसुन चौकशी सुरू होती असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कपुर यांची चौकशी ही दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) ला दिलेल्या कर्जाबाबत सुरू असणार आहे असे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यांच्या घरामध्ये टाकलेल्या छाप्यात डीएचएफशी संबंधित अनेक कागदपत्रे आढळली आहेत. त्याची कसुन चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कपुर यांना देशाबाहेर प्रवास करण्यासाठीही मज्जाव करण्यात आले आहे. तशी नोटीस ईडीकडून बजावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?

डीएचएफल कंपनीला कर्ज देताना पैशांचा अपहार केल्याप्रकरणी ईडीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डीएचएफएल कर्जाच्या घोटाळ्यासोबतच त्यांनी ८० शेल कंपन्यांना तब्बल १२ हजार ५०० कोटी रूपये वळते केले. या कंपन्यांचे १ लाख खोटे कर्ज घेणारे खातेदार होते असे स्पष्ट झाले आहे. या सगळ्या कंपन्यांसोबत २०१५ मध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. हे सगळे आर्थिक व्यवहार येस बॅंकेतूनच झाले आहेत. डीएचएफएलच्या कपिल आणि धीरज वाधवा यांनी पाच कंपन्यांसाठी शेअर्स खरेदी केले होते. त्यामध्ये फेथ रिएलेटर्स, मार्वल टाऊनशीप, एबे रिएलिटी, पोझिडिऑन रिएलिटी, रेमंड रिएलेटर्स यासारख्या कंपन्यांची नावे होते. या कंपन्यांकडून येस बॅंकेला तब्बल २१८६ कोटी रूपये थकीत कर्जाची रक्कम २०१९ अखेरीस येणे अपेक्षित होती.

- Advertisement -

येस बॅंकेच्या ग्राहकांचे हाल

वाढत्या कर्जाच्या बोजामुळे येस (YES) बॅंकेवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेने यावर निर्बंध घातले आहेत. येस बॅंकेच्या ग्राहकांसाठी आरबीआयने नवीन सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ग्राहकांना पैसे काढताना फक्त ५० हजार रूपयेच काढण्याची कमाल मर्यादा ठेवण्यात आली आहे. आरबीआयने केलेल्या घोषणेनुसार आज एसबीआयचे माजी सीएफओ यांची येस बॅंकेवर प्रशासक म्हणून नेमणुक केली आहे. आगामी महिनाभर म्हणजे ३ एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहे. येस बॅंकेचे संचालक मंडळ रद्द करण्याचा निर्णयही आज आरबीआयने घेतला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येस बॅंकेचा कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत गेला आहे. खातेदारांना फक्त वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील. पण त्यासाठी आरबीआयची विशेष मंजुरी घ्यावी लागेल. बॅंकेच्या खातेदारांचा विश्वास वाढावा म्हणूनच आरबीआयमार्फत तातडीने ही पावले घेण्यात आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -