घरताज्या घडामोडीस्वतःच डॉक्टर बनू नका, पंतप्रधानांनी 'करोना'वर टोचले कान

स्वतःच डॉक्टर बनू नका, पंतप्रधानांनी ‘करोना’वर टोचले कान

Subscribe

घाबरून जाऊन उगाचच अफवा किंवा भीती पसरवू नका

आपण आपली नमस्ते करण्याची उत्तम सवय आता विसरत आहोत की काय असा प्रश्न पडू लागला आहे. म्हणूनच भारतीयांची नमस्ते करण्याची सवय कायम ठेवा त्यामुळे करोना व्हायरस पसरण्याचा धोकाही टाळता येईल असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फेसबुक पेजवरून दिला आहे. घाबरण्याची किंवा भीती वाटण्याची गरज नाही. काही गोष्टी केल्यामुळे नक्कीच या आरोग्याच्या संकटावर मात करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. काही छोट्या छोट्या टीप्समधून त्यांनी देशवासीयांमध्ये या व्हायरसबाबत असलेली चिंता, काळजी, भीती कमी करण्याचा एक प्रयत्न केला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान ?

गरज नसताना उगाचच जमु नका. करोन व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी वारंवार हात धुण गरजेचे आहे. आपली वारंवार चेहऱ्याला नाकाला हात लावण्याची सवय सोडा. धुतलेल्या हातानेच गरज असल्यास चेहऱ्याला स्पर्श करा. शिंकताना किंवा खोकताना आपल्या शिंकेतून बाहेर पडणारे ड्रॉपलेट्स तसेच खोकल्यातून इतरांना होणारा संसर्ग टाळता येऊ शकतो. त्यासाठी कपडा आणि रूमाल वापरा. हे वापरलेले रूमाल किंवा कपडा दुसऱ्यांच्या संपर्कात येता कामा नये. शिंकल्यावर ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून इतर ठिकाणी हा व्हायरस अनेक दिवस टिकून राहतो. म्हणून शिंकताना काळजी घ्या.

- Advertisement -

आपल्या चेहऱ्यावर मास्क वापरताना वारंवार हात लागल्याने इन्फेक्शेन कमी होण्यापेक्षा वाढते. म्हणूनच बचाव करण्याएवजी इन्फेक्शन वाढवू नका. अनेक लोकांकडून सध्या काय खावे तसेच काय खाऊ नये यासाठीचे सल्ले दिले जात आहेत. म्हणून अशा अफवा पसरवण्याएवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. उगाच स्वतः डॉक्टर बनू नका. करोना व्हायरस वाढणार नाही यासाठीची खबरदारी घेण्याची ही वेळ आहे. त्यामुळे घाबरून जाऊन उगाचच अफवा किंवा भीती पसरवू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -