घरमहाराष्ट्रडीएसके समूहाची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त

डीएसके समूहाची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त

Subscribe

डीएसके घोटाळ्याप्रकरणी डीएसके समूहाची ९०४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

डीएसके घोटाळ्याप्रकरणी डीएसके समूहाची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या घोट्याळ्यावर कारवाई सुरु आहे. या घोटाळ्याप्रकरणी डीएसके कंपनीचे सर्वेसर्वा डी. एस. कुलकर्णी यांना पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली होती. त्यांना येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आले होते. हा घोटाळा तब्बल ३००० कोटी रुपयांचा आहे. या घोटाळ्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी महाराष्ट्र बॅंकेच्या अधिकाऱ्यांनाही अटक केली होती.

आठ कंपनीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांनी आठ कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. त्यामुळे गुंतणूकदरांना पश्चातापराला सामोरे जावे लागत होते. याप्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. डीएसके समूहाची ९०४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -