घरताज्या घडामोडीबारावी परीक्षेबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

बारावी परीक्षेबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Subscribe

मुले सध्या कोरोना आणि परीक्षांच्या तणावाशी अशा दुहेरी संकटाला सामोरे जात आहेत.

केंद्र सरकारने बारावीच्या(१२) सीबीएसई (12th CBSE Board Exam) बोर्डाच्या परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातील बारावीच्या स्टेट बोर्डाच्या परीक्षेचा राज्य सरकार काय निर्णय होणार यावर बैठक सुरु आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले आहे की, बाराबी परीक्षेबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल सर्व तज्ञांचे मत घेऊनच बारावीच्या परीक्षांचे निर्णय घेतला जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. देशात बारावीच्या परीक्षेसंदर्भात एकच धोरण ठरवण्याबाबत केंद्राला पत्र लिहिले होते यानंतर सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील बारावीच्या परीक्षांचे काय होणार याची चिंता आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना लागली आहे. राज्य सरकारने बारावीच्या परीक्षासंदर्भात बैठक घेतली असून या बैठकीत बारावी स्टेट बोर्डच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सीबीएसई सोबत बैठक घेण्यात आली होती तेव्हाही त्यांना परीक्षा रद्द करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. कारण मुले सध्या कोरोना आणि परीक्षांच्या तणावाशी अशा दुहेरी संकटाला सामोरे जात आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला आवाहन केले होते की, बारावीच्या परीक्षांबाबत एकसुत्रता आणावी असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला जाईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे.

राज्यमंत्रीमंडळात बारावीच्या परीक्षेचा विषय मांडण्यात येणार आहे. मंत्रीमंडळाची सुरुवातीपासूनच भूमिका होती की, मुलांच्याबाबतीत खुप विचार करुन निर्णय घेतला पाहिजे. त्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. सगळे निर्णय घेत असताना तज्ञांशी बोलून आणि खुप विचारकरुन निर्णय घेतले असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -