घरताज्या घडामोडीमंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदे, फडणवीसांचं आमदारांना हॉटेलवर निमंत्रण

मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदे, फडणवीसांचं आमदारांना हॉटेलवर निमंत्रण

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. ५० आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. शिंदे गट-भाजपने मिळून राज्यात सरकार स्थापन केलं आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना हॉटेलवर निमंत्रण दिलं आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून उद्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आमदारांना डिनर दिला जाणार आहे. तर उपमुख्यमंत्र्यांकडून रविवारी दोन्ही पक्षाच्या आमदारांना डिनर दिलं जाणार आहे. राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीकरता या स्नेहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्या १६ जुलै रोजी वांद्रे येथील ताज लँड या हॉटेलमध्ये सेना-भाजप आमदारांना संध्याकाळी सात वाजता स्नेह भोजनाचे निमंत्रण आहे. तर १७ जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सेना-भाजप आमदारांना स्नेह भोजनाचं निमंत्रण दिलं आहे. याच दिवशी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात आमदारांना मतदान करण्याचं मार्गदर्शन केलं जाणार आहे.

दरम्यान, येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आहेत. तसेच शिवसेनेने देखील द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : वाट बघण्यालाही मर्यादा असतात, शिंदे गटाचा ठाकरेंना अप्रत्यक्ष अल्टिमेटम


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -