एकनाथ शिंदेंच्या शपथपत्रात प्रॉपर्टीच्या व्यवहारात अफरातफर?, कोर्टात याचिका दाखल

eknath shinde

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्या विरोधात पुण्यातील प्रथमवर्ग न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेद्वारे एकनाथ शिंदे यांच्या 2009, 2014 आणि 2019च्या निवडणूक शपथपत्रात तफावत असल्याचा आरोप  करण्यात आला आहे. 2019च्या निवडणुकीआधी दाखल केलेल्या शपथपत्रात एकनाथ शिंदे यांनी शेत जमीन वाहने मालमत्ता आणि शिक्षण विषयी माहितीत अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अभिजित खेडकर, डॉ अभिषेष हरिसाद यांनी ही याचिका दाखल केली आहे. वकील समीर शेख यांच्यामार्फत ही याचिका शिंदे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे.

2009, 2014 आणि 2019 या विधानसभा निवडणुकीत कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे निवडणूक लढवतात. या निवडणुकांमध्ये सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात तफावती आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

काय आहेत आरोप – 

शेत जमिनीचा घोळ

गाड्यांच्या किंमतीत अफरातफर

शिक्षण अकरावी पर्यंत, पण शाळा वेगवेगळ्या

शेती जमिनी विषयी काय आहे आरोप –

सामना वृत्तपत्राने एकनाथ शिंदे यांनी 2009, 2014 च्या शपथपत्रात शेतजमीन नसल्याचे नमूद केले आहे. मात्र, 2019 मध्ये त्यांच्या पत्नीने ठाणे जिल्ह्यातील चिखलगावात जमीन खरेदी केल्याचा उल्लेख आहे. चिखलगावच्या सर्वे नंबर 8844, 845 ही जमीन 6 ऑगस्ट 2009 मध्ये खरेदी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर 2014,2019 मधीळ शपथपत्रात व्यवसाय, नोकरीच्या तपशिलामध्ये उत्पन्नाच्या स्त्रोतात शेतकरी अशल्याचं नमूद केलेले नाही.

गाड्यांच्या किंमतीत तफावर असल्याचा आरोप काय –

  • 2014च्या शपथपत्रात आरमाडा गाडी आठ लाखाला खरेदी केल्याचे म्हटले आहे. तर 2019 मध्ये हीच गाडी 96,720 रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले आहे.
  • 2014मध्ये स्कॉर्पिओ 11 लाख रुपयांना खरेदी केली होती. पण 2019 मध्ये हीच गाडी अवघ्या 1.33 हजार रुपयांना खरेदी केल्याचे दाखवले आहे.
  • 2014मध्ये 6.96 हजार रुपयांना घेतलेल्या बोलेरोची किंमत 2019 मध्ये 1.89 हजार रुपयांना घेतल्याचे दाखवले आहे.
  • 2014मध्ये एक टेम्पो 92,224 रुपयांना खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, 2019 मध्ये याच टेम्पोची किंमत त्यांनी 21,360 रुपये इतकी दाखवली आहे.
  • 2014च्या शपथपत्रात 17.70 लाखाला खरेदी केलेली इनोव्हा कारची किंमत 2019 मध्ये 6.42 लाख रुपयांत खरेदी केल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.

शिक्षण अकरावी पर्यंत, पण शाळा वेगवेगळ्या असल्याचा आरोप काय –

एकनाथ शिंदे यांचे शिक्षण अकरावी पर्यंत झाले आहे. मात्र, त्यातही एक गडबड दिसून आली आहे. 2009 साली त्यांनी आपल्या शपथपत्रात ठाण्याच्या मंगला हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजमधून 1981 साली उत्तीर्ण झाल्याचे म्हटले आहे. तर 2019च्या शपथपत्रामद्ये त्यांनी ठाण्यातील न्यू इंग्लिश हायस्कूलमधून 1981 साली अकरावी उत्तीर्ण झाल्याचे म्हटले आहे.