घरताज्या घडामोडीएन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा रुग्णालयात दाखल; तुरुंगात बिघडली तब्येत

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा रुग्णालयात दाखल; तुरुंगात बिघडली तब्येत

Subscribe

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची प्रकृती खालावली आहे. प्रदीप शर्मा यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरंगात त्यांची प्रकृती बिघडली आहे.

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची प्रकृती खालावली आहे. प्रदीप शर्मा यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरंगात त्यांची प्रकृती बिघडली आहे. मनसुख हिरेन खून प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. (encounter specialist pradeep sharma health deteriorated in jail admitted in sassoon hospital)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप शर्मा यांच्या पोटात गेल्या काही दिवसांपूर्वी पोटात दुखत होते. पोटात सतत दुखत असल्यामुळे शर्मा यांना सुरक्षेच्या दृष्टीने ससून रुग्णालात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची सोनोग्राफी करण्यात येणार आहे. तसेच, पुढील उपचारासाठी शर्मा हे सध्या ससूनमध्ये आहेत.

- Advertisement -

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान म्हणजेच अँन्टिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. सध्या प्रदीप शर्मा न्यायालयीन कोठडीत आहेत.

मुंबई पोलिस दलातील कार्यरत असताना त्यांच्यावर आत्तापर्यंत 113 एन्काऊटंरची नोंद आहे. प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मधून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता

- Advertisement -

चक्कर आल्याने अनिल देशमुख तुरुंगात पडले

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चक्कर आल्याने तुरुंगात पडले. त्यामुळे मुंबईतील जे. जे. रुग्णालयात देशमुख यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तुरुंगात छातीत दुखण्याची अनिल देशमुखांची ही दुसरी वेळ आहे. याआधीही छातीत दुखत असल्याने त्यांना परळच्या केईएम रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.


हेही वाचा – राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल; मोहित कंबोज यांनी ट्विटरवरून दिली माहिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -