घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल; मोहित कंबोज यांनी ट्विटरवरून दिली...

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल; मोहित कंबोज यांनी ट्विटरवरून दिली माहिती

Subscribe

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against ncp leader vidya chavan following a complaint by bjp leader mohit kamboj)

भाजपा नेते मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. कंबोज यांनी ट्विट करून “जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली” असे म्हणत विद्या चव्हाण यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची कॉपी ट्विट केली आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे जन्मस्थान आणि भाषेवरून विद्या चव्हाण यांनी टीका केली होती. अमित शाह यांच्याबाबत केलेल्या या वक्तव्यावरून मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली होती.

दरम्यान, मोहित कंबोज यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वीच विद्या चव्हाण यांना जय श्रीराम, असे ट्विट केले होते. परंतु, यातून पूर्ण अर्थ स्पष्ट होत नव्हता. परंतु, आज गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील कंबोज यांनी दुसरे ट्विट करून जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली असे म्हणत विद्या चव्हाण यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची कॉपी ट्विट केली आहे.

- Advertisement -

“मोहित कंबोज हे अभ्यास करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. निवडणुकीवेळी मालाड येथे पैशाने भरलेल्या गाडीसह मोहित कंबोज सापडला होता. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सोडून दिले. त्यावेळी फडणवीस यांच्याकडे गृहखाते होते. कंबोज यांचा नातेवाईक ड्रग्ज पेडलर असून, नवाब मलिक यांनी त्याचा भांडाफोड केला होता. त्यानंतर मलिक यांना जेलमध्ये टाकण्यात आले. मोहित कंबोज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. परंतु, तो आता आमच्या विरोधात आरोप करणार का? मोहित कंबोज याला कोणी अधिकार दिले? तो कोण आहे?”, असे सवाल उपस्थित करत मोहित कंबोज यांच्यावर विद्या चव्हाण यांनी टीका केली आहे.


हेही वाचा – एसी लोकल बंद केल्या पाहिजेत; रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर शरद पवार आक्रमक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -