घरताज्या घडामोडीखासदार नवनीत राणांच्या अडचणी वाढणार, आर्थिक गुन्हे शाखा कर्ज प्रकरणाची चौकशी करणार

खासदार नवनीत राणांच्या अडचणी वाढणार, आर्थिक गुन्हे शाखा कर्ज प्रकरणाची चौकशी करणार

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तीकडून ८० लाखाचे कर्ज घेतले असल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर करण्यात आला आहे. युसूफ लकडावालासोबत नवनीत राणांनी आर्थिक व्यवहार केला आहे. या प्रकरणाची ईडी चौकशी करण्यात यावी, ईडीने अद्याप चौकशी का केली नाही असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांच्यातील आर्थिक व्यवहाराच्या आरोपांवर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. नवनीत राणा यांची चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ईडीने जर कारवाई केली नाही तर राज्याची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाची चौकशी सुरु करण्याची शक्यता आहे. यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी लकडावाला यांच्याकडून कर्ज घेतल्याच्या आरोपांवर अद्याप काही वक्तव्य करण्यात आले नाही. राणा दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारकडून खासदार नवनीत राणा आणि डी गँगशी संबंध असलेल्या युसूफ लकडावाला यांच्यातील आर्थिक व्यवहाराची चौकशीची मागणी करण्यात येऊ शकते. नवनीत राणा यांनी ८० लाखांचे कर्ज घेतले आहे. राणा दाम्पत्याचा डी गँगशी संबंध आहे का? याची चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून चौकशी करण्यासाठी EOW चौकशी करण्यात येणार आहे.

लकडावाला डी गँगचा फायनान्सर

युसूफ लकडावाला कुख्यात गुंड दाऊदशी संबंधित असून फायनान्सर होता असा आरोप करण्यात आला. ईडीने युसूफ लकडावालाला अटक केली होती. ५० कोटी किमतीच्या जमिनीची बनावट कागदपत्रे बनवल्याप्रकरणी त्याला ईडीने मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांतर्गत अटक केली होती. ०९ सप्टेंबर २०२१ रोजी आर्थर रोड तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा : नवनीत राणांनी डी गँगशी संबंधित लकडावालाकडून ८० लाखांचं कर्ज घेतलं; राऊतांचा गंभीर आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -