घरमहाराष्ट्रनाशिक : अबकारी खात्याने जप्त केला ६ लाखाचा मद्यसाठा जप्त

नाशिक : अबकारी खात्याने जप्त केला ६ लाखाचा मद्यसाठा जप्त

Subscribe

पाथर्डी फाटा परिसरातील एका घरातून अबकारी खात्याने तब्बल सहा लाख रूपये किमतीचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला आहे. या छाप्यामुळे नाशिकमध्ये परराज्यातून होणाऱ्या बेकायदा मद्यवाहतूकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पाथर्डी फाटा परिसरातील एका घरातून अबकारी खात्याने तब्बल सहा लाख रूपये किमतीचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला आहे. या छाप्यामुळे नाशिकमध्ये परराज्यातून होणाऱ्या बेकायदा मद्यवाहतूकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ १ पथकाने केली आहे.

- Advertisement -

घरावर करण्यात आली कारवाई

रवींद्र पिल्ले आणि हिरामण सखाराम मुंढे अशी मद्यसाठा प्रकरणी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. पाथर्डी फाटा परिसरातील प्रशांतनगर येथील मयुर रो हाऊसमध्ये मद्यसाठा असल्याची माहिती दुय्यम निरीक्षक अ १ पथकास मिळाली होती. त्यानुसार रविवारी भरारी पथकाने सापळा रचून छापा टाकला असता घरात दिव दमण गोवा हरियाणा राज्यात विक्रीकरता असलेले विविध विदेशी मद्याचे ७५ बॉक्स मिळून आले आहेत. पथकाने याप्रकरणी दोघा संशयीतांना बेड्या ठोकत सुमारे पाच लाख ९१ हजार ७८० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला असून ही कारवाई विभागीय उपायुक्त अर्जून ओहोळ, अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सी.एच.पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रवीण ठाकरे, जवान रामकृष्ण झनकर, गौरव तारे, सोन्या बापू माने आदींच्या पथकाने केली आहे.


हेही वाचा – लाखो रुपयांचा विदेशी मद्यसाठा हस्तगत


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -