घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट

महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट

Subscribe

राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भात चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अदाज आहे.

मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या वेळी समुद्राकडे जाण्यास बंदी –

- Advertisement -

यंदाच्या मान्सूनमध्ये आत्तापर्यंत समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेत समुद्रकिनारी जाण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर समुद्रकिनारी जाऊ नये अशी सूचना महापालिकेने दिली आहे. अलर्टच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावर लाईफगार्ड, स्पीड बोटस्, अग्निशमन दलाची संरक्षक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

परशुराम घाट 9 जुलैपर्यंत बंद –

- Advertisement -

चिपळूणमधील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परशुराम घाट कालपासून बंद करण्यात आला असून तो 9 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. घाटात धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

लोकल सेवेवर परिणाम –

सध्या मुंबई, ठाणे तसेच उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईमधील तिन्ही रेल्वे मार्गांवरील रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. लोकल रेल्वे उशिराने निघत आहेत.

देशातील स्थिती –

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जम्मू आणि काश्मीरपासून मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ढगफुटी, भूस्खलन, अतिवृष्टी आणि महापुराने दिवसभरात विविध राज्यांमध्ये सुमारे २० जणांचा मृत्यू झाला आहे.

९ जुलै : रेड अलर्ट

१० जुलै : ऑरेंज अलर्ट – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर

८-११ जुलै : सोसाट्याचा वारा – कोकण आणि गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहेल.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -