घरमहाराष्ट्रकेंद्राला कुठलेही कायदे करु द्या, पण शेतकऱ्याच्या हिताला धक्का लागेल असा निर्णय...

केंद्राला कुठलेही कायदे करु द्या, पण शेतकऱ्याच्या हिताला धक्का लागेल असा निर्णय घेणार नाही – मुख्यमंत्री

Subscribe

आपल्या राज्यातला शेतकरी मजबूत आहे. तुम्ही काळजी करुन नका. केंद्रामध्ये काय कायदे करायचे असतील ते करु द्या, पण माझ्या शेतकऱ्याच्या हिताला धक्का लागेल, अशी एकसुद्धा गोष्ट हे सरकार करु देणार नाही, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ते कृषी दिनानिमित्त आयोजित कृषी संजिवनी मोहिम आणि पिक स्पर्धा विजेत्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांचा शेतकरी विरोध करत आहेत. या कायद्यांविरोधात गेली कित्येक महिने शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यावरुन मुख्यमंत्र्यांनी बोलताना हे कृषी कायदे आहेत तसे लागू करणार नसल्याचं शेतकऱ्यांना आश्वस्त केलं. राज्यातील शेतकऱ्याच्या हिताला धक्का बसेल अशी एकही गोष्ट हे तुमचं हक्काचं महाविकास आघाडी सरकार करणार नाही, ही तुम्ही खात्री बाळगा, असं मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांचं कौतुक केलं. आज कृषी दिन आणि डॉक्टर दिन आहे. दोघांचेही महत्व आपल्याला या कोविड काळात कळलं आहे. शेतकरी आणि डॉक्टर हे दोघेही अन्नदाते आणि जीवनदाते आहेत. शेतकऱ्यांच्या वेदना मला माहीत आहेत. दुष्काळ, पूर, गारपीट, कोरोना अशा संकटांच्यावेळी शेतकरी डगमगला नाही. शेतकरी राजा हा राज्याचे वैभव आहे. गेले काही काळ निसर्ग बदलतो आहे. सोन्यासारखे पीक नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त होत असते. अशा अनिश्चित परिस्थितीत सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही कामकाजाची सुरुवात पीक कर्ज मुक्तीपासून केली. नंतर कोरोनाचे संकट आले पण शेतकऱ्याने अर्थव्यवस्थेत जे योगदान दिले त्याचे उपकार विसरता येणार नाही. आम्ही विकेल ते पिकेल ही योजना घेऊन आलो. जे पिकवीन ते विकलं गेलंच पाहिजे असं ठरवलं. शेतकऱ्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आपल्या सरकारच्या टीमच्या कामाला दाद देत असताना लाखो शेतकऱ्यांचेही कौतुक आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -