घरमहाराष्ट्रनाशिकपिंपळगाव बसवंतला आज शेतकरी मेळावा

पिंपळगाव बसवंतला आज शेतकरी मेळावा

Subscribe

अ‍ॅड. शुभांगी शेरेकर करणार शेतकर्‍यांना मार्गदर्शन

पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्हा बँकेने जिल्ह्यात सुरू केलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनींची जप्ती, जमिनींचे लिलाव, शेतकर्‍यांच्या जमिनीवर बँकेचे नाव लावणे या प्रक्रियेच्या विरोधात शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य काँग्रेस सहकार सेल आक्रमक झाली आहे. जिल्हा बँकेला कायदेशीर आव्हान देण्यासाठी आज पिंपळगाव बसवंत येथील घोडके नगरमध्ये अ‍ॅड. शुभांगी शेरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे.

या मेळाव्यास शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन बोराडे, जिल्हा काँग्रेसाध्यक्ष तुषार शेवाळे, काँग्रेसचे राजाराम पानगव्हाणे, सुचेता बच्छाव, विश्वासराव मोरे, चंद्रकांत खोडे, राजेंद्र मोगल, ज्ञानेश्वर चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. शेतकरी मेळाव्यास जिल्हा बँकेचे कर्जदार शेतकरी, थकबाकीदार शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते भगवान बोराडे, आयोजक पुंडलिक गायकवाड, राम मोरे यांनी केले आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेच्या कारवाईला न घाबरता या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन शेवटी राजाभाऊ गांगुर्डे, राहुल गांगुर्डे, मधुकर शेलार, अमोल बागुल, राजाभाऊ मोरे व शेतकरी संघटना आणि काँग्रेस पक्ष सहकार सेल यांनी केले आहे.

जिल्हा बँकेने शेतकर्‍यांच्या कर्जावर अव्वाच्या सव्वा व्याज लावून शेतकर्‍यांच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनींचे लिलाव सुरू केले आहे. वास्तविक शेतकर्‍यांचे कर्ज अल्प असून शेतकर्‍यांच्या कोट्यवधींच्या जमिनींचे लिलाव करण्याचा अधिकार जिल्हा बँकेला नाही.
– पुंडलिक गायकवाड, राज्य उपाध्यक्ष सहकार सेल काँग्रेस पक्ष

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -