घरताज्या घडामोडीभ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरू झालीय आणि यात जनताच जिंकेल, आशिष शेलारांचा मविआवर ...

भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरू झालीय आणि यात जनताच जिंकेल, आशिष शेलारांचा मविआवर निशाणा

Subscribe

जनतेच्या प्रश्नांवर कानाडोळा करुन केवळ भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि आतंकवाद यावर महाविकास आघाडी सरकार काम करते. या सरकारचे वर्णन भ्रष्टाराचा महामेरू असे करावे लागेल, अशी टीका आशिष शेलार यांनी मविआ सरकारवर केली.

Ashish Shelar : आज मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक पार पडली त्यावेळी बोलताना भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच निशाणा साधला. जनतेच्या प्रश्नांवर कानाडोळा करुन केवळ भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि आतंकवाद यावर महाविकास आघाडी सरकार काम करते. या सरकारचे वर्णन भ्रष्टाराचा महामेरू असे करावे लागेल, अशी टीका आशिष शेलार यांनी मविआ सरकारवर केली. देशात भ्रष्टाचाराची लढाई सुरू झाली आहे या लढाईत जनताच जिंकेल. असा विश्वास देखील आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

भ्रष्टाचाराच्या लढाईत गरीब माणूस जिंकेल, भ्रष्टर व्यवस्था पराजीत होतील , आंतकवाद पराजीत होईल सामान्य जनतेच्या मनातील राम राज्य येण्याची मुहूर्तमेळ सुरू झाली आहे, असे आशिष शेलार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘भ्रष्ट व्यवस्था का किला भस्त हो, नैतिकता का पत प्रशस्थ हो, गुरुजनको शासनका भय हो, सज्जन का जीवन नीर्भय हो, व्यक्ती व्यक्ती कहे गर्व से मुझमे मेरा धर्म बचा हे’ असा टोला देखील शेलारांनी यावेळी लगावला.

भाजपने ठरवले २०१४ ला जनतेला वचन दिले होते. त्यानुसार, टप्प्याने कायद्यातील बदल, काळ्या पैशावर मात करण्याच्या योजना, प्रत्यक्षात कारवायांमुळे महाविकास आघाडी सरकारची अस्वस्थता वाढली आहे. म्हणून देश आणि महाराष्ट्र आता अशा वळणार आहे जिथे लोकशाही विरुद्ध घराणेशाही या संघर्षाला सुरुवात होऊन त्याचे टोक गाठले जाणार आहे, अशी टीका आशिष शेलारांनी केली.

- Advertisement -

Yashwant Jadhav IT Raid : स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी ITची धाड, नेमकं काय आहे प्रकरण?

सध्या सुरू असलेल्या ईडी चौकशांवर आशिष शेलार म्हणाले. यंत्रणा निष्पक्ष काम करतात. त्या चौकशींचे काय येईल हे ते समोर आणतील त्यानंतर त्यावर भाष्य करणे सोयीचे आहे. पदावर बसलेला लोकांनी कायदे, प्रथा परंपरा, यंत्रणांची नियमावली पाळणे आवश्यक आहे. पदावर असलेल्या व्यक्ती अशा वागू लागल्या तर राज्यात अराजकता पसरवण्याचा त्यांचा तो अंजेडा आहे असा समज होईल , असे आशिष शेलार म्हणाले.


हेही वाचा – आयकर अधिकाऱ्यांना यशवंत जाधव उत्तर देण्यास सक्षम, भाजप नेते दुध के धुले – महापौर किशोरी पेडणेकर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -