घरमहाराष्ट्रदानवे - महाजन यांच्या समोर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा

दानवे – महाजन यांच्या समोर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा

Subscribe

रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्यासमोरच भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यामुळे पुन्हा एकदा अंतर्गत वाद समोर आला आहे.

राज्यात सत्ता स्थापन झाली असली तरी मात्र, अजूनही भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसून येत आहे. भुसावळ अध्यक्ष पदासाठी जळगावमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रावसाहेब दानवे, गिरीश महाजन देखील उपस्थित होते. मात्र, या बैठकीत पक्षातील दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी चक्क व्यासपीठ सोडून निघून गेले.

कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरु

जळगावमध्ये भाजपाच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. दरम्यान, नेत्यांच्या बैठकीला सुरुवात होताच अचानक पक्षातील दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरु झाली. त्यावेळी रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन देखील त्यावेळी उपस्थित होते. मात्र, वाद वाढल्यानंतर रावसाहेब दावने बैठकीतून निघून गेले.

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडीची सत्तास्थापन झाल्यापासून जळगाव जिल्हा राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांमुळेच झाला असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळे आपले तिकीट कापण्यात आल्याचे खडसे म्हणाले होते. त्यामुळे विधानसभेच्या निकालाआधीपासूनच हा वाद सुरु होता.


हेही वाचा – CAA कायद्याला पाठिंबा देण्यासाठी शिक्षकांची शालेय विद्यार्थ्यांना धमकी!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -