घरताज्या घडामोडीपीएमपीएमएल चालक आणि दुचाकीस्वाराची हाणामारी; पुण्यातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

पीएमपीएमएल चालक आणि दुचाकीस्वाराची हाणामारी; पुण्यातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Subscribe

पुण्यामधील पीएमपीएमएल बस चालक आणि नागरिक यांच्यातील वाद सातत्याने वाढत आहेत. दररोज नागरिक पीएमपीएमएल विषयी तक्रार करत असतात. अशातच रविवारी पीएमपीएमएल बस चालक आणि दुचाकीचालक याच्यात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली.

पुण्यामधील पीएमपीएमएल बस चालक आणि नागरिक यांच्यातील वाद सातत्याने वाढत आहेत. दररोज नागरिक पीएमपीएमएल विषयी तक्रार करत असतात. अशातच रविवारी पीएमपीएमएल बस चालक आणि दुचाकीचालक याच्यात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली. ओव्हरटेक केल्याने हाणामारी झाल्याचे समजते. या प्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे. (fight in pmpml driver and two wheeler man in pune viral video)

पुण्यात रविवारी स्वारगेट डेपोची बस क्रमांक-७९९ डीआर २५५० ही सुसाट वेगाने पुणे स्टेशन परिसरात आली. त्यावेळी दुचाकीवरून तरुण जात असून, ते बससमोर आडवे आले. थोडक्यात अपघात टळल्याने चालक आणि दुचाकीस्वार या दोघांमध्ये बाचाबाची झाली. पुणे स्टेशन स्थानक परिसरात घडली. बाचाबाची सुरू असताना दुचारी स्वाराने थेट चालकाची कॉलर पकडून चपलांनी हाणामारी सुरू केली.

- Advertisement -

चालकाला मारहाण करत असल्याचे बघताच वाहकही बसमधून खाली आला आणि त्याने दुचाकीस्वाराला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी शेजारचे लोक त्याठिकाणी बचावासाठी आले, मात्र दोघेही थांबायला तयार नव्हते. तरुणांनी चालकाला चक्क चपलेने मारले. या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी हा व्हिडिओ काढला.

या घटनेमुळे पुणे स्टेशनच्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – खुनाचा गुन्हा चालला असता, पण विनयभंगाचा मान्य नाही, जितेंद्र आव्हाड भावूक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -