घरताज्या घडामोडीसिंदखेडाराजा अपघातातील मृतांच्या वारसांना एसटीतर्फे 10 लाख रुपयांची आर्थिक मदत

सिंदखेडाराजा अपघातातील मृतांच्या वारसांना एसटीतर्फे 10 लाख रुपयांची आर्थिक मदत

Subscribe

बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे ही भीषण घटना घडली. या अपघाताची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाकडून माहिती घेतली. तसेच प्रशासनाने प्रवाशांना व त्यांच्या नातेवाइकांना मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, या अघातातील मृतांच्या वारसांना एसटी महामंडळाकडून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई-नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे ही भीषण घटना घडली. या अपघाताची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाकडून माहिती घेतली. तसेच प्रशासनाने प्रवाशांना व त्यांच्या नातेवाइकांना मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, या अघातातील मृतांच्या वारसांना एसटी महामंडळाकडून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (Financial Help Of Rs 10 lakh by ST to the heirs of Sindkhed Raja accident victims)

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेडाराजा येथील पळसखेडी चक्का गावाजवळ आज सकाळी पुणे ते मेहकर एसटी बस आणि कंटेनर ट्रकच्या झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 6 जण मृत्युमुखी पडले असून 10 जखमी आहेत. मृतांच्या वारसांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी 10 लाख रुपये तत्काळ द्यावेत. तसेच, जखमी प्रवाशांना योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

नेमका अपघात कसा घडला?

भरधाव ट्रक आणि एसटीच्या धडकेने हा भयंकर अपघात घडला आहे. आज सकाळी 6.15 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त झालेली बस आज (23 मे) सकाळी औरंगाबाद येथून वाशिमच्या दिशेने निघाली होती. पण मुंबई-नागपूर महामार्गावरील सिंदखेडराजा जवळच्या पळसखेड चमकत गावाजवळ या बसला भरधाव वेगात असणाऱ्या कंटेनरची धडक बसली. ज्यामध्ये बसच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला आहे. तर बस चालकाला जागीच आपला जीव गमवावा लागला आहे.

- Advertisement -

अपघातातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक

या अपघातातील 10 जण जखमी झाले असून, जखमींपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालया येथे उपचार सुरु आहेत. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – भाजपाला कोण पराभूत करू शकतो या आधारावर जागावाटपाचा निर्णय व्हावा – नाना पटोले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -