घरमहाराष्ट्रपेण: जेएसडब्लू कंपनीच्या प्लांटला आग,एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

पेण: जेएसडब्लू कंपनीच्या प्लांटला आग,एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

Subscribe

पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक वसाहतीत जेएसडब्लू कंपनीच्या प्लांटला आग लागली. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही आग लागली. जेएसडब्लू कंपनीच्या सेंटर टू ऑपरेशन प्लांट अचानक भडका उडला. या आगीत दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. तर एकजण जागीच ठार झाला आहे.

बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भरत साहू, परेश आणि आणखी एक कर्मचारी सेंटर टू ऑपरेशन प्लांटमध्ये मटेरियल मिक्सरमध्ये टाकण्याचे काम करत होते. त्यावेळी अचानक आग लागून मोठा भडका उडाला. या आगीत भरत साहू जागीच ठार झाला आहे. तर परेश गंभीर जखमी झाला आहे. भरत साहू (छत्तीसगड)चा रहीवासी आहे. तर परेश (स्थानिक) आणि मूळचा मध्य प्रदेशचा असलेला कामगार हे दोघे गंभीर आहेत. या अपघाताला कंपनी प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -