घरताज्या घडामोडीदीपिका पादुकोण ही टुकडे टुकडे गँगची सदस्य - खासदार साक्षी महाराज

दीपिका पादुकोण ही टुकडे टुकडे गँगची सदस्य – खासदार साक्षी महाराज

Subscribe

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी सुद्धा दीपिकाचे जेएनयूमध्ये जाण्यावर टीका केली आहे.

जेएनयू परिसरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनेसुद्धा जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. परिणामी दीपिकाला कौतुक आणि टीकेचा सामना करावा लागत आहे. यातच आता भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी सुद्धा दीपिकाचे जेएनयूमध्ये जाण्यावर टीका केली आहे.

काय टीका केली आहे?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने नुकतीच जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. त्यावर भाजपचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी आयएएनएस ला दिलेल्या मुलाखतीत दीपिकावर टीका केली आहे. मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, “दीपिका पादुकोण ही तुकडे तुकडे गँगची सदस्य आहे. या सर्वांमागे काही परदेशी शक्तींचा देखील पाठींबा असल्याचे साक्षी महाराज यावेळी म्हणाले.

- Advertisement -

दीपिकावर टीका का?

रविवारी रात्री दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) काही बुरखा घातलेल्या तरुणांनी हल्ला केला. या हल्ल्यात जेएनयु विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोष यांच्यासह अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारत या घटनेचा निषेध सुरु केला. दरम्यान जेएनयू मधील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ गाठलं. यावेळी तिच्यासोबत जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार देखील उपस्थित होता. जेएनयू हल्ल्याचा निषेध नोंदवल्यामुळे दीपिकाला कौतुक आणि टीकांचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा – JNU Attacke: दीपिका पदुकोण, कन्हैया कुमार जेएनयूत पोहोचले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -