घरमहाराष्ट्रअग्निशमन अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

अग्निशमन अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

Subscribe

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या उपअधिकारी आणि फायरमनला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) रंगेहाथ पकडले. ही कारवाई अग्निशमन विभागाच्या पिंपरी, संत तुकारामनगर येथील कार्यालयात करण्यात आली.
उपअधिकारी उदय माधवराव वानखेडे आणि फायरमन अनिल सदाशिव माने या दोघांना १६ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पडकण्यात आले. या प्रकरणी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वानखेडे हे पिंपरी महापालिकेच्या अग्निशमन विभागात उपअधिकारी पदावर कार्यरत आहेत. तर, अनिल माने हा फायरमन आहे. तक्रारदाराचे वाकड येथे बांधकाम चालू होते. बांधकामाला अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी तक्रारदाराने अग्निशमन केंद्र येथे प्रकरण दाखल केले होते. त्यासाठी वानखेडे यांनी प्रोव्हिजनल फायर ना हरकत प्रमाणपत्राची फाइलची पूर्तता करून वरिष्ठांकडे पाठविली होती.
तक्रारदाराला त्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र देखील दिले होते. परंतु, या मोबदल्यात वानखेडे आणि माने यांनी तक्रारदाराकडे १६ हजार रुपये लाच देण्याची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसबीने शनिवारी वानखेडे यांना तक्रारदाराकडून १६ हजार रुपयांची आणि माने याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -