घरमहाराष्ट्रआधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलेन; महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त...

आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलेन; महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान

Subscribe

मुंबई – सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या संभाजी भिडे यांनी आज चक्क महिला पत्रकारासमोरच वादग्रस्त विधान केलं आहे. आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलेन असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महिला वर्गांनी संताप व्यक्त केला आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरता मंत्रालयात आले होते. त्यानंतर, संभाजी भिडे यांच्याशी बोलण्याकरता एक महिला पत्रकार पुढे आली. त्यांनी संभाजी भिडे यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याआधी तू आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलेन असं प्रत्युत्तर संभाजी भिडे यांनी दिलं. प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरुप असते. भारतामाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो, असं संभाजी भिडे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – अंधेरी पूर्वसाठी उद्या मतदान, भाजपाची माघार पण सात उमेदवार रिंगणात, कोण मारणार बाजी?

रुपाली चाकणकरांचे समन्स

महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्त्रीचा तिच्या कर्तृत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारा आहे. त्यामुळे तुमच्या भूमिकेचा खुलासा करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

- Advertisement -

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -