घरताज्या घडामोडीसंभाजी भिडेंची महिलांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कधी थांबणार?

संभाजी भिडेंची महिलांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कधी थांबणार?

Subscribe

महिलांविरोधात सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी गुरुजींवर नेटकऱ्यांमध्येही संताप पाहायला मिळतो. यावेळी महिला पत्रकारच्या प्रश्नावर उत्तर देताना, तु आधी टीकली लाव मग बोलेन असं संभाजी भिडे म्हणाल्यामुळे चर्चेत आले आहेत.

शिवप्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा महिलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महिला पत्रकाराला आधी टिकली लाव मग तुझ्याशी बोलेल असं वक्तव्य भिडे गुरुजींनी केलं आहे. तर यापूर्वी सुद्धा स्त्रीला ‘वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते’ असे वक्तव्य केले होते. महिलांविरोधात सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी गुरुजींवर नेटकऱ्यांमध्येही संताप पाहायला मिळतोय. यावेळी महिला पत्रकारच्या प्रश्नावर उत्तर देताना, तु आधी टीकली लाव मग बोलेन असं संभाजी भिडे म्हणाल्यामुळे चर्चेत आले आहेत. परंतु भिडेंची महिलांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवप्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांशी कोणत्या विषयावर भेट घेतली असा प्रश्न महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी विचारला असता की तू आधी टिकली लाव तर तुझ्याशी बोलेन असे संभाजी भिडे म्हणाले. भिडे गुरुजींच्या या वक्तव्यामुळे अनेक महिला आणि तरुणी संताप व्यक्त करत आहेत. सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

- Advertisement -

काय म्हणाले संभाजी भिडे?

मंत्रालयात महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांना तुम्ही कोणाची भेट घेतली असा प्रश्न केला. यावर भिडे म्हणाले की, तू आधी टिकली लाव तर तुझ्याशी बोलेन, आमची अशी भावना आहे की, प्रत्येक स्त्री भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाही. त्यामुळे तु आधी टिकली लाव मग तुझ्याशी बोलेन असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते – भिडे

संभाजी भिडे यांनी यापूर्वीसुद्धा अनेकवेळा महिलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भिडे गुरुजी नेहमीच रोख बोलतात. त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. भिडे यांनी २०१९ मध्ये सांगली येथे महिलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होते. “जसं नपुंसकत्व आल्यावर पुरुषत्व कमी होतं तसचं वांझ स्त्रीमध्ये स्त्रीत्व कमी असतं. अशा लोकांसाठी आपण नपुंसक आणि वांझ यासारखे शब्द वापरतो. तसंच हिंदूंच झालं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्व या विषयाबद्दल पुरुषत्व आणि स्त्रित्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे. राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर आम्ही कमी पडतो. सुधारित नागरिकत्व कायदा भारतीयांना जोडणारा आहे. असं असतानाही काहीजण याबद्दल संभ्रम पसरवताना दिसत आहेत” असं संभाजी भिडे म्हणाले होते. भिडेंच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात महिलांकडून निषेध करण्यात आला होता.

- Advertisement -

माझ्या शेतातील आंबा खाल्यावर आपत्यप्राप्ती – भिडे

संभाजी भिडे यांनी यापूर्वीसुद्धा आपत्यप्राप्तीवरुन वादग्रस्त विधान केले होते. सभेत बोलताना ते म्हणाले होते की, माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना आपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत १८० जोडप्यांनी आंबा खाल्ला त्यातील १५० जोडप्यांना आपत्यप्राप्ती झाला असल्याचे संभाजी भिडे म्हणाले आहेत. यावेळीसुद्धा त्यांना टीकांना सामोरे जावे लागले होते.

कोरोनादरम्यान भिडेंचं वक्तव्य

राज्यात कोरोनाची साथ पसरली असताना कोरोनाची लागण होणाऱ्यांवर भिडेंनी प्रतिक्रिया दिली होती. “मुळात करोना हा रोग नाही. करोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. करोना हा रोग नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असे वक्तव्य भिडे गुरुजींनी केलं होते. परंतु काही महिन्यानंतर भिडे यांनाच कोरोनाची लागण झाली होती.

कोण आहेत संभाजी भिडे?

संभाजी भिडे यांचे मूळ नाव मनोहर असून ते सांगलीतील सबनीसवाडी गावचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही ते १९८० च्या दशकात कार्यरत होते. १९८४ मध्ये भिडे गुरुजींनी शिवप्रतिष्ठानची स्थापना केली. बाबरी मशीद आणि राम जन्मभूमीच्या वादात भिडेंना चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच भीमा कोरेगाव प्रकरणातही संभाजी भिडे यांचे नाव समोर आले होते. भिडेंनी आतापर्यंत महिलांविरोधात, देशातील नागरिकांविरोधात अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली यामध्ये त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली आहे.


हेही वाचा : ठाकरे-शिंदे संघर्ष पुन्हा वाढणार? सिल्लोडमध्ये सत्तार अन् आदित्य ठाकरे शक्तिप्रदर्शन करणार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -