घरमहाराष्ट्रपुणेकोल्हापुरातील शिवसेनेचे पाच माजी आमदार गोव्यात, प्रकाश आबिटकरही नॉट रिचेबल

कोल्हापुरातील शिवसेनेचे पाच माजी आमदार गोव्यात, प्रकाश आबिटकरही नॉट रिचेबल

Subscribe

एकनाथ शिंदे आपल्याच पक्षाविरोधात बंड पुकरल्याने राज्यात राजकारणात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याती शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांना सकाळपासून कोणताही संपर्क झालेला नाही. यातच जिल्ह्यातील पाच माजी आमदारांनी गोव्यात मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सेनेचे सर्व माजी आमदार गोव्यात असल्याची माहिती माजी शिवसेना आमदार उल्हास पाटील यांनी दिली आहे. उल्हास पाटील यांच्यासह राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सत्यजीत पाटील, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर यांनी गोव्यात मुक्कामी आहेत. सांगलीमधील अनिल बाबर, सातारमधून मंत्री शंभूराजे देसाई तसेच महेश शिंदे यांच्यासह 35 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदेंची गटनेतेपदावरून हकालपट्टी –

एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा स्पष्टच संदेश दिल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे त्यांची भूमिका समजावून घेण्यासाठी तसेच मुख्यमंत्र्यांच्या निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर सुरतच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत विकास फाटकही आहेत.

- Advertisement -

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -