घरमहाराष्ट्रपाच महिन्यांच्या बालिकेला म्युकरमायकोसिस

पाच महिन्यांच्या बालिकेला म्युकरमायकोसिस

Subscribe

लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू

कोरोना संसर्गाची दुसरी लाट अनेक ठिकाणी ओसरताना दिसत असतानाच शिर्डीत एका पाच महिन्यांच्या बालिकेला आधी कोरोना होऊन गेला आणि आता म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. तिच्यावर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, इतक्या लहान मुलीला म्युकरमायकोसिस झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत वास्तव्यास आहे. त्यांची परिस्थिती सामान्य आहे. त्यांना दोन मुली आहेत. त्यातील धाकटी मुलगी पाच महिन्यांची आहे. मे महिन्यात २७ तारखेला या मुलीला जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत होता.त्यामुळे त्या मुलीला नाशिकमध्ये हलवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -