घरताज्या घडामोडीनियम पाळा, लॉकडाऊन टाळा

नियम पाळा, लॉकडाऊन टाळा

Subscribe

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहरात जनजागृती

शहरात कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत असून सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु रूग्णसंख्या वाढतच राहील्यास पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ येउ शकते. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी काटेकोरपणे नियम पाळणे गरजेचे आहे. या संदर्भात जनजागृती करण्यासाठी नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरात बॅनर लावत नागरीकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विनामास्क फिरणार्‍यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. परंतु काही ठिकाणी अद्यापही जनजागृती होत नसून नागरिक बेफिकीरीने फिरताना दिसतात. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क झाल्याचे पाहायला मिळते. परंतु नागरिकांमध्ये पुन्हा जनजागृती होणे तितकेच महत्वाचे आहे. यामुळे वाहनधारकांना आपल्या कुटुंबासह इतरांच्या आरोग्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी शहरातील विविध सिग्नलवर युवक राष्ट्रवादीच्या वतीने नियम पाळा, लॉकडाऊन टाळा असे बॅनर लावण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नाशिक लॉकडाऊनच्या दिशेन वाटचाल करताना पहावयास मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर लवकरच नाशिकमध्ये प्रशासन कडक निर्बंध लागू करून लॉकडाऊन करतील. त्यामुळे लॉकडाउन टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
अंबादास खैरे, शहराध्यक्ष, रायुकाँ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -