घरमहाराष्ट्रसांगलीमध्ये महाप्रसादातून १५० जणांना विषबाधा

सांगलीमध्ये महाप्रसादातून १५० जणांना विषबाधा

Subscribe

सांगलीमध्ये १५० भाविकांना महाप्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. जत तालुक्यातील निगडी बुद्रुक गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर गावामध्ये एकच खळबळ उडाली होती.

सांगलीमध्ये नवरात्री दरम्यान प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. सांगलीतल्या जत तालुक्यातील निगडी बुद्रुक गावात ही घटना घडली आहे. दुर्गा माता देवीच्या अष्टमी यात्रेतील प्रसाद खाल्ल्याने १५० लोकांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्यांवर खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत

प्रसादाचा शिरा खाल्ल्याने विषबाधा

जत तालुक्यातील निगडी ब्रुद्रुक गावामध्ये दुर्गादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादातील शिल्लक राहिलेला शिरा आज सकाळी गावातील गावकऱ्यांवा वाटण्यात आला. हा शिरा खाल्ल्यानंतर काही नागरिकांना पोटदुखी, उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. अनेकांना अस्वस्थ वाटू लागले.

- Advertisement -

सर्वांची प्रकृती स्थिर

विषबाधा झालेल्या सर्वांना ताबडतोब खासगी रुग्णालय आणि शासकिय रुग्णालयात नेण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांसह पुरुष आणि महिलांचा समावेश आहे. १०० जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या घटनेमुळे निगडी बुद्रुक गावात खळबळ उडाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -