मुंबईतील भाजपचे माजी आमदार तारासिंग यांच्या नातवाने घेतला राष्ट्रवादीचा झेंडा हाती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पुढाकाराने चंद्रपूर महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेविका राजलक्ष्मी कारंगल व माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

यासोबतच महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण व मुंबई विभागीय कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्या पुढाकाराने मुंबई शहरातील गुरज्योत सिंग किर आणि त्यांचे सहकारी गंगादीप सिंग चुढा, अश्मीत सिंग बांगा, समीर शेख, रश्पाल सिंग बुमराह, अर्जुन शिर्के आणि रितेश गुर्राला यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी आणि पक्षाचे नेते आनंद शिंदे यांच्या पुढाकाराने मिलिंद जगताप, पंकज चंदनशिवे, मनोज वेलॉद्रा, कैलास गायकवाड यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

आदरणीय शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी सर्व मान्यवरांना मिळेल. आजच्या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर पक्षाचा प्रभाव वाढण्यास नक्कीच सहकार्य मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या जागा वाढण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्नांची शिकस्त करू, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, चंद्रपूर जिल्हा निरीक्षक प्रविण कुंटे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.