घरदेश-विदेशदिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

Subscribe

दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. योगानंद शास्त्री काँग्रेसमध्ये असताना दोन टर्म मंत्री राहिले आहेत. नुकतीच दिल्ली काँग्रेसची फेररचना झाली. यावर नाराज होऊन योगानंद शास्त्री यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

योगानंद शास्त्री यांचं शारद पवार यांनी पक्षात स्वागत केलं. दिल्ली शहरात आणि इतर शहरात आमच्या पक्षाचे काम सुरू आहे. शास्त्री यांनी कामातून आदर्श घालून दिला आहे. विधानसभा कशी चालवावी याचा आदर्श योगानंद शास्त्री यांनी घालून दिला. मी अध्यक्ष म्हणून शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मी स्वागत करतो, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

योगानंद शास्त्री हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक मानले जायचे. पण २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांनी बुधवारी दिल्लीत पक्षप्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

- Advertisement -

यावेळी शरद पवार यांनी त्यांचं स्वागत करताना देशाच्या राजधानीत योगानंद शास्त्री यांच्यासारख्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे ही खूप महत्त्वाची बाब असल्याचं म्हटलं. आज केंद्रात भाजपच्या सरकारमुळे अनेक सांप्रदायिक शक्तींनी अराजकता मांडली आहे. अशा स्थितीत जनतेला व्यक्त होण्यासाठी एका व्यासपीठाची गरज आहे. योगानंद शास्त्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेशी चर्चा करावी, जनतेला असं व्यासपीठ निर्माण करून द्यावं. जेणेकरून समाजात शांतता आणि एकजूट नांदेल.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -