Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेत कॉपीच्या चार घटना उघडकीस

पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेत कॉपीच्या चार घटना उघडकीस

Subscribe

पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेदरम्यान कॉपीच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी मेघवाडी, कस्तुरबा मार्ग, भांडुप आणि गोरेगाव पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून चारही उमेदवारांविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेदरम्यान कॉपीच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी मेघवाडी, कस्तुरबा मार्ग, भांडुप आणि गोरेगाव पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून चारही उमेदवारांविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ( Four incidents of copying were revealed in the written examination of the post of police constable )

पोलीस शिपाई होण्यापूर्वीच या चौघांनाही तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. रविवार ७ मेला मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा एकाच वेळेस मुंबईतील एकूण २१३ केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी तिथे कोणताही अनुचित प्रकारासह कॉपीसारख्या गैरप्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. या परिक्षेसाठी १ हजार २४६ पोलीस अधिकारी आणि ५ हजार ९७५ पोलीस कर्मचारी बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले होते. स्वत:  पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे वैयक्तिकरीत्या देखरेख करत होते. तरीही चार परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या चार उमेदवारांनी मोबाईलच्या मदतीने कॉपीसह मित्रांची मदत घेण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले.

- Advertisement -

रविंद्र शिवाजी काळे हा तरुण वरळीतील गणपत जाधव मार्ग, बीडीडी चाळीत राहतो. तो बोरिवलीतील राजेंद्रनगर, जे. बी खोत हायस्कूलमध्ये परीक्षा देण्यासाठी आला होता. तो मोबाईलवरुन शिवम बेलुसे याच्या मदतीने पेपर सोडवत असल्याचे निदर्शनास येताच त्याला तिथे उपस्थित पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसर्‍या घटनेत बबलू मदनसिंग मेढरवाल या उमेदवाराला भांडुप पोलिसांनी अटक केली. बबलू हा जालन्याच्या भोकरदन, इब्राहिमपूरचा रहिवाशी आहे. तो भांडुप येथील व्हिलेज रोड, ब्राईट हायस्कूलमध्ये परिक्षा देण्यासाठी आला होता. यावेळी तो मोबाईलवरुन प्रितम गुसिंगे याच्याशी बोलताना आढळून आला. त्यामुळे त्याला भांडुप पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिसर्‍या घटनेत युवराज धनसिंग जारवाल या उमेदवाराला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. तो गोरेगाव येथील उन्नतनगर रोड क्रमांक दोन, महानगरपालिका शाळेत परीक्षा देण्यासाठी आला होता. त्याच्याकडे मोबाईलसह इतर डिव्हाईस सापडले होते. युवराज हा औरंगाबादच्या गंगापूर, टाकळीवाडी कदीमचा रहिवाशी आहे. चौथ्या घटनेत अन्य एका उमेदवाराला मेघवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी चार स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन पोलिसांनी चार उमेदवारांविरुद्ध अटकेची कारवाई केली होती.

( हेही वाचा: महाराष्ट्रात ‘राष्ट्रवादी’चं मोठा विरोधी पक्ष; अजित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर )

दोन आयपीएस अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या

- Advertisement -

राज्य पोलीस दलातील दोन पोलीस अधिकार्‍यांच्या गृहविभागाने सोमवारी अंतर्गत बदल्या केल्या आहेत. मुंबई एटीचे पोलीस उपमहानिरीक्षक महेश पाटील यांची ठाण्याच्या पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी तर नागपूर लोहमार्गचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांची बुलढाणा येथे पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच काही आयपीएस अधिकार्‍यांना बढती देऊन त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर काही अधिकारी बदल्याच्या प्रतिक्षेत होते. अखेर सोमवारी दोन पोलीस अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून आगामी दिवसांत आणखीन काही अधिकार्‍यांच्या बदल्या अपेक्षित असल्याचे बोलले जाते.

- Advertisment -