घरमहाराष्ट्रआंबेनळी घाटाच्या चौपदरीकरणाची गरज 

आंबेनळी घाटाच्या चौपदरीकरणाची गरज 

Subscribe

कोकण कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या सहलीच्या बसला झालेल्या अपघातामुळे रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणार्‍या पोलादपूरमधील आंबेनळी घाट चर्चेत आला आहे. आंबेनळी त्याचबरोबर ‘फिटझगेराल्ड’ अशी ब्रिटिशकालीन ओळख असलेल्या या घाटरस्त्याचे चौपदरीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.  ब्रिटिशांनी केवळ 37 हजार रूपयांमध्ये बांधलेला आंबेनळी घाट आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोलादपूर उपविभागाच्या अखत्यारीत असून, दरवर्षी लाखो रूपयांची विकासकामे होऊनही घाटरस्ता कायम धोकादायक राहिला आहे.

कोकण कृषी विद्यापीठाची बस कोसळलेल्या अपघातस्थळीदेखील संरक्षक कठडे उभारण्यासाठी दरीच्या बाजूला साईडपट्टीवर खड्डे खणण्यात आले होते. तिथेच ही बस दरीमध्ये कोसळेल, अशी पुसटशी शंकादेखील कोणास आली नव्हती. आंबेनळी घाटातील 28 किमी रस्त्याला साईडपट्टी, संरक्षक कठडे, रस्त्यावरील खड्डे, डोंगरातून कोसळणारी दरड, धोकादायक वळणे आणि तीव्र उताराचा रस्ता आदीमुळे निर्माण होणार्‍या धोक्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी डोंगरातून कोसळणार्‍या दरडप्रवण क्षेत्रामध्ये गॅबियन नेटवर्क करण्याच्या प्रस्तावावरही शासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
—-

- Advertisement -

अपघातात मृत्युमुखी पडलेले प्रवासी

विक्रांत अर्जून शिंदे (44, गिम्हवणे, ता.दापोली,जि.रत्नागिरी), सचिन मोतीराम गिमणेकर (29, गिम्हवणे,ता.दापोली,जि.रत्नागिरी), निलेश पांडुरंग तांबे (27, चंद्रनगर, गोरिवलेवाडी,ता.दापोली,जि.रत्नागिरी), संतोष मारूती झगडे (35,तेलेवाडी गिम्हवणे, ता.दापोली, जि.रत्नागिरी), राजेंद्र रघुनाथ रिसबूड (51, नंदाश्री अपार्टमेंट, ता.दापोली, जि.रत्नागिरी), संजीव वसंत झगडे (42,तेलेवाडी गिम्हवणे,ता.दापोली), प्रशांत प्रवीण भांबडे (42,पांगारवाडी जालगांव,ता.दापोली), रत्नाकर मधुकर पागडे (37,चंद्रनगर, ता.दापोली), सचिन चंद्रकांत झगडे (38,तेलेवाडी गिम्हवणे, ता. दापोली), प्रमोद मोहन शिगवण (33,वडाचा कोंड, ता.दापोली), सुनिल देऊ कदम (52,खेर्डी, ता.दापोली), राजाराम जिबाबा गावडे (36,उंबर्ले, ता.दापोली, मूळ रा. वेंगुर्ला,जि.सिंधुदूर्ग), प्रमोद रमेश जाधव (33,माहू,ता.मंडणगड),पंकज रामचंद्र कदम (30,पांगारवाडी जालगांव,ता.दापोली), रितेश रामचंद्र जाधव (33, जालगांव, ता. दापोली), विनायक रमेश सावंत (37, कासार्डे,  ता.कणकवली), संदीप विठ्ठल सुर्वे (48, बाजारपेठ, ता.दापोली), सुनील तुकाराम साठले (47,श्रीरामनगर, जालगांव, ता.दापोली), राजेंद्र विठ्ठल बंडबे (45,लष्करवाडी जालगांव,ता.दापोली), सुयेश विनायक बाळ (55, लाडघर, ता.दापोली), संदीप मारूती झगडे (35,तेलेवाडी गिम्हवणे,ता.दापोली),संदीप आत्माराम गुजर (38,वणद,ता.दापोली), रोशन जाया तबीब (31,पाचपंढरी हर्णे, ता.दापोली),दत्तात्रेय धोंडीबा धायगुडे (40,अहिरे, खंडाळा, जि.सातारा), हेमंत बापू सुर्वे (45,रा.दापोली, मूळ रा. तुळसणी देवरूख,ता.संगमेश्वर), किशोर पांडुरंग चौगुले (42,पाचपंढरी हरणे,ता.दापोली), संदीप दत्तात्रेय भोसले (48,मारूती  मंदिरसमोर दापोली) संतोष उत्तम जळगावकर (45,वडाचा कोंड, ता.दापोली), राजेश सखाराम सावंत (36,गिम्हवणे,ता.दापोली) आणि जयवंत हरिश्चंद्र चोगले (34,पाजपंढरी हर्णे,ता.दापोली) एकूण 30 मृतदेह रविवारी दुपारी आंबेनळी घाटातील चिरेखिंड आणि दाभिळ दरम्यानच्या दरीतून काढण्यात यश आले. यानंतर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये डॉ. भास्कर जगताप, डॉ. साईराज सुतार, डॉ.वाघमोडे, डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाइकांना मृतदेहचा ताबा दिला.

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आंबेनळी घाटासह पोलादपूर ते वाई शिरूर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. पहिल्या टप्प्यात पोलादपूर येथून 5 किलोमीटर आणि महाबळेश्वर येथून पाच किलोमीटर असे चौपदरीकरण होणे अपेक्षित आहे.
–  प्रवीण दरेकर, विधान परिषद सदस्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -