घरमहाराष्ट्रचार वर्षांच्या चिमुकलीचे प्लास्टिक बंदीचे आवाहन

चार वर्षांच्या चिमुकलीचे प्लास्टिक बंदीचे आवाहन

Subscribe

शार्लिन घोडकेचे सर्वच सस्तरातून कौतुक

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने केलेल्या प्लास्टिक बंदीची जनजागृती करण्यासाठी उल्हासनगरच्या शार्लिन सॅमसन घोडके या विद्यार्थिनीने केलेली आगळी वेगळी वेशभूषा ही सर्वांचेच आकर्षण ठरले आहे. पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक बंदी योग्य असल्याचे शर्लिनने पालकांना सांगितले. उल्हासनगरच्या वडोल गावातील सेंट जोसेफ कन्व्हेंट स्कुलमध्ये शर्लिन घोडके ही नर्सरीमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या वर्गात गुरुवारी वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत तिच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मात्र शर्लिनची वेशभूषा ही सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. शर्लिनचा ड्रेस हा काळ्या रंगाच्या गारबेज बॅग पासून बनविण्यात आला.

शर्लिनची स्पर्धेसाठी तयारी करणारी तिची आई माधुरी घोडके यांनी सांगितले की, राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केल्यानंतर सरकारवर अनेक व्यापाऱ्यांनी टीका केली होती. अनेकांचे रोजगार बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात कामगार बेरोजगार झाले आहेत. पर्यावरणाची प्रदूषणापासून सुटका करण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य असून त्याचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे शार्लिनची वेशभूषा करून तिच्या हातात प्लॅस्टिक बंदी कशाप्रकारे गरजेची आहे त्याबाबतचा संदेश देणारे फलक बनवून तिच्या हातात दिला, असे शार्लिनची आई माधुरी घोडके यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्य सरकारने पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिक, थर्माकोल आणि प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोझेबल वस्तू, त्यांचे उत्पादन आणि वापरावर राज्यात लागू केलेल्या बंदीची अंमलबजावनी सुरू केली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ५ ते २५ हजारांपर्यंत दंड किंवा तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होत आहे. त्यामुळे प्रदूषणासाठी हानिकारक असलेले प्लास्टिक दूर ठेऊन पर्यावरण संरक्षणासाठी एक पाऊल पुढे येण्याचे आवाहन शर्लिनच्या शिक्षिका निकिता शर्मा यांनी केले आहे. यावेळी शिर्लिनने केलेल्या छोटेखानी भाषणात प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले.


हेही वाचा – उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजपच्या निलंबित आमदाराला जन्मठेपेची शिक्षा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -