घरमहाराष्ट्रदुर्दैवी! कांदिवलीत घर कोसळून चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

दुर्दैवी! कांदिवलीत घर कोसळून चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

Subscribe

एका चार वर्षीय चिमुरड्याचा घर कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात ही घटना घडली आहे. कांदिवली पश्चिम इस्लाम कंपाउंड उत्तर भारतीय सेवासंघ चाळीजवळ गटाराचे काम सुरु असताना ही घटना घडली.

एका चार वर्षीय चिमुरड्याचा घर कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मुंबईतील कांदिवली परिसरात ही घटना घडली आहे. कांदिवली पश्चिम इस्लाम कंपाउंड उत्तर भारतीय सेवासंघ चाळीजवळ गटाराचे काम सुरु असताना ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केल.

या दुर्घटनेत नौशाद अली (४) या लहान मुलाचा गंभीर जखमी झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. तर शाहीदुनिसा रैन (३०), हसीना शहा (२२) या दोन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर नजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (जुने शताब्दी) रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली (पश्चिम), लालजी पाडा, शिंपोली टॉवरजवळ रस्त्याच्या कामाअंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम सुरू होते. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्ते काम करण्यासाठी अगोदर ड्रेनेज लाईनचे काम हाती घेत एका चाळीतील तळमजला अधिक एकमजली घराजवळ अंदाजे तीन – चार फूट खोदकाम केले होते. मात्र ड्रेनेज लाईनचे काम पूर्णत्वास येण्यापूर्वीच सदर एक मजली घराचा मोठा भाग कोसळला.

शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास अचानकपणे कोसळला. या घटनेप्रसंगी मोठा आवाज झाल्यानं आजूबाजूच्या नागरिकांनी त्या दुर्घटनाग्रस्त घराजवळ धाव घेतली व बचावकार्य तत्परतेने सुरू केले. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकानेही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले.

- Advertisement -

या घटनेतील मृत मुलाच्या कुटुंबियांना पालिकेने १० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी. तसेच, जखमींनाही मोफत उपचार देऊन काही प्रमाणात आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी केली आहे. सदर दुर्घटना का व कशी काय घडली, त्यास जबाबदार कोण याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि वार्ड अधिकारी हे अधिक चौकशी करीत आहेत.


हेही वाचा – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तीन लाचखोर अधिकाऱ्यांना अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -